प्रवीण उर्फ गोलू वानकर यांचे आकस्मित निधन,नाभिक समाजाकडून भावपूर्ण श्रद्धांजली!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
नाभिक समाजातील ज्येष्ठ समाज कार्यकर्ते तसेच समाजातील मार्गदर्शक माननीय रत्नाकरजी वानकर यांचा कनिष्ठ मुलगा प्रवीण उर्फ गोलू वानकर यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनामुळे समाजातच नव्हे तर कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहेत. या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबासह नातलगांना तसेच समाजातील नाभिक समाज बांधवांना ईश्वर शक्ती देवो ,अशीच महाराष्ट्र नाभिक महामंडळ चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात येत आहे.
गणपती बाप्पाचा निरोप हा गोलू साठी अखेरचा निरोपच राहिला अशी खंत व्यक्त केल्या जात आहे.
वयाच्या बाविस, पंचवीस वर्षात त्यांच्यावर काळाने घात घातला. कुटुंबातील करता , युवा मुलगा पडद्याआड झाल्याने कुटुंबाचा आधारवड गेल्याचे शल्य आई-वडिलांसह भावाला सोडून आज या जगाचा त्याने निरोप घेतला आहे. ही कुटुंबासाठीच नवे तर समाजासाठी भरून निघाली पोकडी आहे. त्याच्या आत्म्याला ईश्वर शांती शांती लाभो हीच महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!