अपघातग्रस्तांचे बयान न घेता , त्या कंट्रेनर ड्रायव्हरला चौकशीअंती सोडल,पोलिसांची चौकशी संशयाच्या भोवर्यात?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
बल्लारपूर तालुक्यातील बामणी ते राजुरा जाणाऱ्या हायवे रोडवर दिनांक ११/९/२०२१ रोजी दुपारी कंटेनर न.MH४९ ०२६२ हया गाडी चालवत असलेल्या चालकाने मद्यधुंद, व बेसावध गाडी चालवून समोरील येत असलेल्या दोन गाड्यांना जबर धडक दिली होती. ड्रायव्हर अपघातस्थळी गाडी सोडून पळून गेला होता. पाच-सात दिवस होऊ नये ही कुठलीही कारवाई बल्लारशा पोलिसांनी केली नव्हती. या संदर्भाची बातमी प्रकाशित होता. संबंधित पोलिस विभागाने आपल्या हालचालीला सुरुवात केली. आणि त्या फरारीत असलेल्या ड्रायव्हरला त्याच्या मालकाच्या मॅनेजरकरवी स्वतः पोलीस स्टेशनला हजर करून त्याच्यावर पोलीस स्टेशन मधून बेलेबल गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र या घटनेत बाकीच्या अपघातग्रस्त व्यक्तींचे मत व्यक्त न नोंदवता. फक्त एकाच गाडी ड्रायव्हरचे बयान येऊन चालकाला व कंटेनरला सुप्रतन्नाम्यावर सोडण्यात आले. अशी माहिती समोर आली असून ती पोलिसांच्या कार्यसूची वर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी दिसून येत आहे?.
हे सर्व होण्याअगोदर संबंधित अपघातग्रस्तांचे बयान नोंदवणे गरजेचे असताना. तसे न करता फक्त मद्यप्राशन करुन असलेल्या ड्रायव्हरचे बयान नोंदवून सोडण्यात आले. जर ड्रायव्हरला वेळीच पकडण्यात आले असते तर त्याचे वैद्यकीय तपासणी केली असती, तर तपासनीत तो मद्यप्राशन केल्याचे निदर्शनास आले असते. आणी त्यांनी हा अपघात जाणीवपूर्वक, जीव घेण्याच्या हेतूने केला असल्याचे निदर्शनास आले असते.
असा प्रकारच्या मधधूंद, डायव्हर. किन्नर रूजू करून त्यांच्या कडून कळत नकळत हेतुपुरस्कर काम करून घडलेल्या अपराधावर कंटेनर मालक
पळदा टाकत असेल तर, असा बेजबाबदार चालका किन्नर कडून पुन्हा किती अपघात
होण्याची वाट पाहात आहे. म्हणून पिढीत व्यक्तीच्या घरच्यांचे म्हणने आहे की, कंटेनर मालकाचा वाहतूक परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
तसेच अपघात ग्रस्त व्यक्ती गोविंद सोनी माध्यमाशी बोलताना सांगितले. धडक एवढी जोरदार होती की नशीब बळवंत म्हणून माझे प्राण वाचले थोडक्यात का होईना पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यावर आज लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात कुठल्याही प्रकारची साधी विचारपूसही गाडी मालकाकडून करण्यात आलेली नाही. आणि भरपाई सुद्धा झाली नाही. या संदर्भाची पोलिसांनी अपघात ग्रस्ताचे बयान नोंदवून ( किन्नर )असलेल्या ड्रायव्हवर
पोलीस स्टेशन मध्ये २७९/३३७/४२७/१३४/१८४/ या प्रकारच्या गुन्ह्याची नोंद केली असून अपघातग्रस्ताचे बयान झाल्यानंतर 338 हे कलम किंवा त्यानंतरच्या येणाऱ्या कलमा लावून गुन्हा नोंद केल्या जाईल असे तपास अधिकारी एपीआय प्रमोद रासकर यांनी सांगितले.
मात्र या प्रकरणात उशीर होत असल्याने व अपघातग्रस्तांच्या बया न घेताच कंटेनर व ड्रायव्हरला जामिनावर सोडणे, तसेच त्याची वैद्यकीय तपासणी न करता या सर्व गोष्टींचा कुठेतरी संशय निर्माण होत असून पोलिसानी राजकीय बळाला बळी न पडत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे
अल्टो कार मधील जखमींचे नाव गोविंद सोनी व आकाश बोंडेले रा. चंद्रपुर असे असल्याचे समजले.
करीता भरधाव वेगाने कंटेनर चालवीत आनुन गाडीला व अल्टो गाडीला ठोस मारून त्यातील गोविंद सोनी व आकाश बोंडेले रा. चंद्रपुर आणि दुसरा गाडीमधील सुजाता ताकसांडे यांना जखमी करण्यास कारनीभुत असलेल्या कंटेनर क्रमांक एम.एच.४९/०२६२ च्या चालकावर कठोर कारवाईसह ,याप्रकरणाची चौकशी करून अपघातग्रस्तांना न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.