सुगंधी तंबाखूत मोठे मासे अजूनही गळा बाहेर! प्रशासनाचा आंधळेपणा, की राजकीय पाठबळ!





सुगंधी तंबाखूत मोठे मासे अजूनही गळा बाहेर!
प्रशासनाचा आंधळेपणा, की राजकीय पाठबळ!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
जिल्ह्यात काही दिवसापूर्वी सुगंधित तंबाखू संदर्भात प्रशासनाने मोठे राॅकेट जिल्ह्यात सक्रिय असल्याचे उघड झाले. त्यात वसीमला अटक करण्यात आली. त्याच्यावर तंबाखूजन्य अन्वे विविध कलमा अंतरत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पुढे काय?
  याच गोरख धंद्यात असलेले नूतन, हरीश, जयसुक, मनसुक, गणेश यांच्यासारखे मोठे मासे अजूनही प्रशासनाच्या हातात लागले नाहीत. यांना काय म्हणावे राजकीय पाठबळ, की प्रशासनाचा आंधळेपणा हा मोठा संशोधनाचा विषय असून यावर का! कारवाई केली जात नाही याचा प्रश्न मात्र चंद्रपूराच्या मनात  उपस्थित होत आहे. जिल्ह्यात मादक , उत्तेजित नशील्या पदार्थाचे मोठ्या प्रमाणात  राकेट जिल्ह्यात सक्रिय असून भविष्यात ते घातकही ठरणार आहेत.यात शंका बाळगता येत नाही नाही.
  पोलीसप्रशासन  जिल्ह्यामध्ये बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूचा करोडचा व्यापार  संबंधित विभागाला लाखोची " बिदागी" असल्यामुळे करोडोच्या रूपाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्हा पोलिस विभागातीला सायबर सेलने   वायरल होत असलेल्या  व्हिडिओची सखोल तपासणी केली तर, यात जिल्ह्यात दारूबंदीत होत असलेल्या दारूच्या महापुरा पेक्षाही, सुगंधित तंबाखूचा महापूर हा मोठ्या प्रमाणात जिल्हा होत आहे. हे नाकारता येत नाही.    सुगंधित तंबाखू   प्रत्येक पान टपरी वर मावाच्या (ख-र्याच्या )स्वरूपात सुगंधित तंबाखू विकल्या जात आहे. हे प्रशासनाला माहित असून सुद्धा जिल्ह्यात सुगंधित तंबाखू बंदी असताना फार मोठ्या प्रमाणात सुगंधित  तंबाखूची तस्करी    वसीमला  अटक झाल्यानंतरही थांबली नाही? म्हणजेच जिल्ह्यात सुगंधित तंबाखू चे फार मोठे  मासे आजही सक्रिय आहेत हे नाकारता येत नाही. यावर अन्न व औषध प्रशासनची मुक सहमती मनाव, की  पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने, राजकीय पाठबळाने,  सर्रास जिल्ह्यात   सुगंधित तंबाखूचा मोठा पुरवठा होत आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराला गांभीर्याने घेऊन सखोल चौकशी केली तर  गभाळ  बाहेर येईल. मोठे मासे गळाला लागतील यात शंका नाही !