14 करोड लागतचे बनलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहातील सीसी टिव्ही कॅमेरे बनले शोभेची वस्तू !






14 करोड लागतचे बनलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहातील सीसी टिव्ही कॅमेरे बनले शोभेची वस्तू !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात एकमेव असे 14 करोडोचे प्रियदर्शनी सभागृह बांधण्यात आले. त्याची देखरेख जिल्हा प्रशासनाकडे असून ते काही दिवसा अगोदर वादग्रस्त राहिले आहेत.
कोरोना काळात अनेक दिवस बंद राहिले प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सभागृहात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसापासून बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना काळाल्यानंतर या सभागृहात कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली असून विविध कार्यक्रम पार पडत असतात. मात्र येथे सीसीटीव्ही कॅमेरे हे फक्त शोभेची वस्तू झाले असून येथे दिनांक 14 /11 /2021 ला चंद्रपूर मिस & मिस्टर अशा फॅशन शोचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात  मोबाईल चोरी गेले असून  काही व्यक्तींच्या  वस्तूही चोरी गेल्याच्या प्रकार  समोर आल्या असून  मात्र या  ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे कुठलाही तपास करणे कठीण झाले आहे.एकीकडे जिल्हाप्रशासन सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात सिसिटिव्ही कॅमेरे लावण्यासाठी  आग्रही असतो. मात्र स्वतः व्यवस्थापन  व देखरेख असलेल्या प्रियदर्शनी सभागृहाची   व्यथा  काही वेगळीच  असून याकडे जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.

दिनचर्या न्युज