पिपरी (धानोरा) तंटामुक्त अध्यक्षपदी रंगराव पवार यांची अविरोध निवड

पिपरी (धानोरा) तंटामुक्त अध्यक्षपदी रंगराव पवार यांची अविरोध निवड

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
ग्राम पंचायत पिपरी येथे नुकतीच संरपच सौ. वैशाली चंदु माथने यांचे अध्यक्ष खाली ग्रामसभा पार पडली. सभेला उपसरपंच हरीओम पाटेवडे, ग्रामपंचायत सदस्य पारस पिंपळकर गणेश आवारी, भुवन चिने, सौ. ज्योतीताई पिंपड़कर सौ. मायाताई मुसले, सौ. वर्षांताई निबरड, सौ.
सुनिताताई मत्ते, व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तुकडोजी महाराजाच्या विचार धारेवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते रंगराव पवार यांची महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी अविरोध निवड झाली. त्याची निवड झाल्याबद्दल श्री संतोष माते, सुरेश चौधरी, चंदू माथने, भास्कर गानफाडे, अनिले कंडे, गुलाब ताजणे ग्रामस्थानी अभिनंदन केले.