पाचवी संविधान गोपाल नगर येथे शाखा संपन्न, नागरिकांचा उत्फूर्त सहभाग, विविध विषयावर चर्चा





पाचवी संविधान गोपाल नगर येथे शाखा संपन्न, नागरिकांचा उत्फूर्त सहभाग, विविध विषयावर चर्चा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महापुरुषांच्या विचारावर कार्य करणाऱ्या सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट ने सुरु केलेल्या "संविधान शाखा" उपक्रमाला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यात नागरिकांमध्ये भरतीय संविधानाला अपेक्षित बंधुभाव निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न केल्या जातो तसेच भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या समता स्वातंत्र्य, बंधुता, धर्मानिरापेक्षता, न्याय, शिक्षण आणि स्वास्थ्य या मूलभूत गोष्टीवर विचार करण्यात येतो.
दि 9 जानेवारी 2022 ला गोपाल नगर ग्राउंड, शिवाजी नगर येथे पाचव्या संविधान शाखेचे आयोजन सकाळी 7.30 ते 9.00 दरम्यान केले गेले होते. सुरवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे द्वारा रचित राष्ट्रवंदनेचे सामूहिक गायन करण्यात आले. नंतर भारतीय संविधानाच्या उद्धेश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या नंतर नुकट्याच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ओबीसी विध्यार्थ्यांच्या पोष्ट ग्रॅज्युईट मधील आरक्षणा बाबत चर्चा करण्यात आली. मेडिकल शिक्षणाच्या पोष्ट ग्राडुएट शिक्षणातील प्रवेशा मधे ओबीसीना आरक्षण दिल्या जात नव्हते. या विरोधात एम के स्टॅलिन च्या नेतेत्वतील तामिळनाडू सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून ओबीसीना पदव्युत्तर प्रवेशा मधे 27% आरक्षण मिळवून दिल्या बद्धल तामिळनाडू सरकार व भारतीय संविधानाचे आभार व्यक्त करण्यात आले.
तसेच चपाराश्याच्या पदासाठी परीक्षा घेऊन निवड केल्या जाते. मात्र उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवडताना सामायिक न्यायिक परीक्षा न घेता राज्यकर्ते व कॉलेजीयम मधील न्यायाधी्यांच्या मार्जितील व्यक्तीची उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवड केल्या जाते. ही सर्वस्वी चुकीची पद्धती असून या पद्धतीने निवडल्या गेलेले न्यायाधीश नागरिकांना न्याय न डेता आपल्या मर्जी नुसार निर्णय देतात.म्हणून न्यायिक प्राधिकरणा द्वारा सामायिक परीक्षे द्वारे वरिष्ठ न्यायालयातील न्यायाधिशांची निवड झाली पाहिजे असा ठराव संविधान शाखेत घेण्यात आला.
सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे मुख्य संघटक बळीराज धोटे यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झालेल्या पाचव्या संविधान शाखेत जेष्ठ संघटक मा पी एम जाधव सरांनी एक जादूचा प्रयोग करून दाखविला व नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याची गरज विषद केली. चर्चे मधे अडव्होकेट दत्ता हजारे, इंजि मस्के साहेब, प्रा कोसे, मा मंगेश तायवाडे, भास्कर मुन, राजकुमार जवादे, भास्कर सपाट, इंजि एल व्ही घागी, इंजि सूर्यभान झाडें, विजयराव टोंगे, पुरुषोत्तम चौधरी, दुर्योधन साहेब, विजय खनके, ई कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला व चर्चेला योग्य दिशा दिली.
संविधान शाखेला बळीराज धोटे, भास्कर मुन, ऍड दत्ता हजारे, इंजि मस्के, विजय टोंगे किशोर सवाने, डॉ सुरेश महाकुळकर, अशोक साळवे, जगदीश जुनघरी कैलास बांबोडकर, भाऊराव मानकर, डॉ सी एम अच्युत, बंडूभाऊ हजारे, अतिष वडते, उत्तम राऊत, बालाजी कुमरे, पांडुरंग गावतुरे, संतोष आवडे, मनोहर पेंदाम, गुरूदास सोनकुसारे, चंद्रशेखर पोडे, अनंता आत्राम, दिलीप होरे, के जी बिस्वास, अजय शेंडे, तुळशीराम भोयर, डॉ विनोद कायरकर, वी जी पिदूरकर दिलीप पारवे, भास्कर डांगे, भारत कांबळे, राजकुमार चिकटे, सिराजखान घोरी, फिरोजखान घोरी, बशीर शेख, भाविक येरगुडे, चांदेकर, विलास माथणकर, राजेंद्र धात्रक, प्रशांत काटकर, दिनकर भुसारी, दादाजी डवरे, महम्मद एजाज शेख, अनंता ताजने, नवनाथ देरकर, राजकुमार मुसने, ए ए डाखरे, मनोज भोयर, अशोक मुसळे, शामराव देहारकार, अशोक खीरतकर, विजय टोंगे, एस एन मलेकर, उमाकांत धांडे, डी एस राऊत, दिलीप चाटारे, पुरुषोत्तम चौधरी, अभय खीरतकर, राकेश शेंडे, भास्कर सपाट, कुमार गोगुलवार, संजय दुर्योधन, भूमेश सांगोरे, धर्मेंद्र अलोणे, अशोक लाकडे, एस एस पटेल, दीपक वेखंडे, राजकुमार जवादे, जयदेव गजभे, योगेश आपटे, पी एम जाधव, ए व्ही तेंभरे, ए ए बहादुरे, प्रा डी टी कोसे, विजय खनके, स्नेहजित अंबागडे, बी एन बोन्डे, सुरेश देऊरमाल्ले, डॉ पी डब्लू कोयडवर, सूर्यभान झाडें, सौरभ होरे, अनिकेत सातपुते, नितीन शिंदे, एल व्ही घागी, डॉ बाळकृष्ण भगत, वामनराव चंद्रिकापुरे, ए आर चौहान ची उपस्थिती होती. शेवटी राष्ट्रगीत गाऊन समारोप करण्यात आला.