महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतालुका शाखा, चंद्रपूर वतीने राज्यव्यापी लाक्षणिक संप आंदोलन

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतालुका शाखा, चंद्रपूर वतीने राज्यव्यापी लाक्षणिक संप आंदोलन


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डि. एन.ई. १३६ तालुका शाखा, चंद्रपूर जिल्हा - चंद्रपूर
(संलग्न महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ) राज्यव्यापी लाक्षणिक संप आंदोलन
दिनांक: २३ व २४ फेब्रुवारी २०२२ पंचायत समिती चंद्रपूर येथे विविध मागण्यासंदर्भात दोन दिवसाच्‍या आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्मचारी या वारंवार वेटिसधरून, हक्काच्या मागण्या कडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हणून आज पासुन राज्य व्यापी आंदोलन सुरू केले आहे.
प्रमुख प्रलंबीत मागण्या १) नविन पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना पात्र ग्रामसेवकांना लागू करा.
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करणे. बगारी ि
ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता पदवीधर होणे
मनरेगा करिता स्वतंत्र यंत्रणा तयार करणे.

कोविड १९ कर्तव्यावर ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी असतांना मृत्यूमूखी पडलेल्या वारसांना विना विलंब ५० लाख रूपये मिळणे.
निवृत्तीचे वय ६० वर्ष करा.

ग्रामसेवक संवर्गास वैद्यकीय कॅशलेस सुविधा उपलब्ध करा.

राज्यस्तर/जिल्हास्तर आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढ योजना मंजूर करा.

कर्मचारी ग्रामसेवक, शिक्षक, पितृत्व रजा मंजूर करण्यात यावी. जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागातील रिक्तपदे पूर्वीप्रमाणे विस्तार अधिकारी (पंचायत) या प्रवर्गातून भरण्यात यावे.
ग्रामसभा मुख्यालयाबाबतचा बंधनकारक ठराव रद्द करण्यात यावा व इतर २६ मागण्या.
या मागणीसाठी आज चंद्रपूर येथील ग्रामसेवक संघटनांचा वतिने सर्व राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सह सर्व च उपस्थित होते.