तळीरामांचा दारू ढोकसण्याचा अड्डा, पोलीसांचे अभय!





तळीरामांचा दारू ढोकसण्याचा अड्डा, पोलीसांचे अभय?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असतांना पासून सरकारी दवाखाण्याचे समोर मेन रोडवरील मनिषा झेरॉक्सच्या मागे खुल्या जागेवर किसन खाडीलकर व त्यांची पत्नी तसेच त्यांचे घराचे बाजुला असलेल्या श्री पान पॅलेस मधून दारुड्या लोकांना प्लास्टीक ग्लास व पाण्याची बॉटल पूरवठा करुन खुल्या जागेवर दारु पिण्यास प्रोत्साहन देत आहे. त्यांचे बाजुला आमचे आणि बरेच घरे असल्याने त्यांचा त्रास आम्हास होत आहे. वारंवार तक्रारी वर्तमानपत्रात बातम्या देवूनही संबधित विभाग अर्थ व्यवहाराकारणाने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविल्यानंतर त्यात पून्हा प्रचंड प्रमाणात वाढ होवून दारु पिणारे सकाळी ६ वाजेपासून ते रात्रौ १२ वाजेपर्यंत त्यांना प्लास्टीक ग्लास व पाणी ६ बॉटलचा पुरवठा करण्यात येतो. दारु पिणायामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून दारु पितांना मोठमोठ्याने ओरडून अश्लील शिवीगाळ भाषा वापरतात त्यामुळे आजुबाजुला राहणाऱ्यांना प्रचंड त्रास होत असून आजुबाजुचे वातावरण खराब झालेले आहे.

अवैद्य दारू पिणा-याना हटकले असता ते दारु पिणाऱे व्यक्ती जिवे मारण्याची धमकी देत असल्याने आमचे कुटूंब भयभीत आहे.

करिता सदर अवैद्य दारु पिणारे व यास पिण्यासाठी प्रोत्साहन देण्या-यांच्या
तात्काळ बंदोबस्त व उचित कार्यवाही करुन आम्हाला होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी .विष्णु अंबादास खाडीलकर यांनी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाला केले आहे.