विवाहित महीलेला अश्लील संदेश पाठवणे, छळणे महानगर अध्यक्षा भोवले




विवाहित महीलेला अश्लील संदेश पाठवणे, छळणे महानगर अध्यक्षा भोवले 

विनयभंगाचा गुन्हा दाखल 

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- 
काही दिवसापासून एका   विवाहित स्त्रीला आपल्या कचाट्यात घेण्यासाठी.  तिला वारंवार त्रास देण्याचे षड्यंत्र  कुणाल रामटेके करीत होते . काही दिवसापूर्वीच त्या महिलेचे पती  हे आपल्या पत्नीला   आणण्यासाठी गेले असता. या महाशयांने तिला धमकावले होते.  अशातच त्या महिलेच्या पतीने स्वतःच्या अंगावर आग लावून घेतली होती. त्यात महिलेचे पती  साठ टक्क्यांच्या वर जडला गेले.    त्याला खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते . मात्र कुणाल रामटेके एवढ्यावरच न थांबता त्या खाजगी हॉस्पिटल मध्ये जाऊन तिथेही त्यांनी त्याच्या नातलगा समोर बाचाबाची  केल्याची तक्रारही  शहर पोलीस ठाण्यात पोलिसात देण्यात आली होती.

 वारंवार  या महिलेला कुणाल रामटेके  हा महिलेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तिला व्हाट्सअप्प द्वारे सतत प्रेमाचा आलाप करीत संदेश पाठविण्यात आले.

कुणाल रामटेके यांनी महिलेला प्रेमाच्या आकंठात बुडण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितला मात्र महिलेने रामटेके यांनी नकार दिला.
या प्रकरणी शहर पोलिसांनी कलम 354 व विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत रामटेके ला अटक केली.

एकीकडे महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कांग्रेस नेहमी आवाज उचलण्याचे काम करतो तर दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते महिलांची छेड करताना दिसत आहे.

चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्डात राहणाऱ्या फिर्यादी महिलेचा पतीसोबत वाद झाल्याने याबाबत महिला तक्रार निवारण केंद्रात समुपदेशनासाठी पाठविले.

फिर्यादी महिलेच्या नातेवाईकमार्फत कुणाल रामटेके यांची ओळख महिलेसोबत झाली, रामटेके यांनी स्वतःला तक्रार निवारण केंद्रातील कर्मचारी असल्याचे त्या महिलेसमोर दर्शविले व आता मी तुमचं समुपदेशन करण्यासाठी येणार असे सांगितले.
यानंतर रामटेके यांनी त्या महिलेला होकार देण्यास सांगितले अन्यथा महिला निराधार केंद्रात पाठविण्याची धमकी दिली.
रामटेके यांचं कृत्य आवाक्याबाहेर होताच महिलेने सरळ शहर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवली.
कांग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या चंद्रपूर महानगर अध्यक्ष कुणाल रामटेके यांत त्यांची वर्णी लागली होती. 

कांग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षातील अनुसूचित जाती विभागाचे चंद्रपूर महानगर अध्यक्षा वर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली.

आधीच चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेस पक्षात अंतर्गत  वाद सुरू आहे. अशातच एका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महानगराध्यक्ष वर विनयभंगाचा गुन्हा दाखल होणे,  हे पक्ष्याला कलंकित करणारे आहेत