केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवेंनी नाभिक समाजाची माफी मागावी!






केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवेंनी नाभिक समाजाची माफी मागावी!

काय म्हणाले दानवे...
दानवे म्हणाले, तिरुपती बालाजी येथील न्हावी एकाच्या डोक्याला पाणी लावून दोन वस्तऱ्याने अर्धी चाटी करून ग्राहकांना बसवून ठेवतात. मग दुसऱ्या ग्राहकांची अर्धी चाटी करून त्यालाही बसवून ठेवतात. संध्याकाळ पर्यंत अशी गर्दी करून अर्धे केस कापून ठेवत आपला व्यवसाय करतात. ' अशा वक्तव्याचा निषेध निषेध...

दिनचर्या न्युज
चंद्रपूर
महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रांताध्यक्ष कल्याण दळे यांच्या आदेशानुसार नुसार सर्व नाभिक समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करन्यात आला. 
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री अॅट्रॉसिटी कायद्यात समाविष्ट करा रावसाहेब यांनी समाजाबद्दल केलेल्या अभद्र टिप्पणीमुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर कडून व न्हावी समाजाने त्यांचा निषेध केला आहे. त्यांनी न्हावी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा चंद्रपूर जिल्ह्य़ातील नाभिक समाजाने दिला. दानवेंच्या वक्तव्याने न्हावी व्यवसायीक व नाभीक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात. अशा सामाजिक व्यवसायाची टिंगल टवाळी व विनोद आजपर्यंत अनेक राजकिय नेतेमंडळींनी केली. असल्यामुळे नाभिक समाजाची नेहमी अवहेलना होत आहे. न्हावी यामुळे नाभिक समाजासनाभिक समाजांनी केव्हापर्यंत असे अपमानीत व्हावे व आपले मनोबल खचत ठेवावे. न्हावी समाजास अवहेलना व हेळसांड मधून मुक्त करण्यासाठी, त्यास आळा बसवावा या करिता अक्ट्रासिटी कायद्यामध्ये समाविष्ट करावे. अशा अपमानास्पद अभद्र वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर न्यायालयात व्यक्तीगतरित्या याचिका दाखल करून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा अध्यक्ष दिनेश एकवनकर, शहराध्यक्ष संदेश चल्लीरवार, शाम राजूरकर, सलून दुकान अध्यक्ष राजू कोंडस्कर, जिल्हा कार्याध्यक्ष माणिकचंद चन्ने, बंटी कडवे,दत्तूभाऊ कडूकर, सतिश मांडवकर, शुभम कोंडस्कर, विठ्ठल चौधरी,
मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.