ॲड.स्वाती देशपांडे (आंम्बाडे) यांनी अतिसंवेदनशील प्रकरणात, एकाच न्यायालयात ऐतिहासिक तिन निर्णय
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
बाललैंगिक अत्याचारासारख्या अतिसंवेदनशील प्रकरणात एका दिवसात एकाच न्यायालयाने तीन वेगवेगळ्या प्रकरणात आरोपींना शिक्षा सुनावण्याचा ऐतिहासिक निर्णय चंद्रपूर विशेष पास्को जलदगती न्यायालयाने सोमवारी दिला. यापूर्वी चंद्रपूरच नव्हे तर विदर्भात सुद्धा एकाच दिवसात एकाच कोर्टाने तीन प्रकरणात आरोपींना शिक्षा देण्याचा निर्णय कोणत्याही कोर्टात झाला नाही हे विशेष. बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे अतिसंवेदनशील असतात अनेक प्रकरणात तर फिर्यादी हे तीन ते पाच, सहा वर्षाची मुले मुली असतात अशावेळी आरोपीविरुद्ध फिर्यादीचे साक्ष नोंदवताना नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांना मोठी कसरत करावी लागते. चंद्रपूर पास्को विशेष न्यायालयाच्या विशेष सरकारी वकील ॲड.स्वाती देशपांडे ( आंम्बाडे ) यांनी आपले कसब पणाला लावत दिवसभरात तीन वेगवेगळ्या प्रकरणात आरोपीला शिक्षे पर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आहे. यातील पहिले प्रकरण गडचांदूर पोलीस ठाणे हद्दीतील होते. एका अकरा वर्षीय मुलाला आरोपी महादेव गोंडे याने हरभरा देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला होता या प्रकरणात आरोपीविरुद्ध भादवि 377 आणि पास्को 4,5 कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात साक्षीपुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला दहा वर्षाचा कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, दुसरे प्रकरण जिवती पोलीस ठाणे हद्दीतील होते. या प्रकरणात आरोपी भिमराव मडावी याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून केला होता. यातून तिने एका मुलीला सुद्धा जन्म दिला होता विशेष म्हणजे या प्रकरणात फिर्यादी मुलगी फितूर झाली होती. यानंतर जन्माला आलेल्या मुलीच्या डिएनएच्या आधारे आरोपीचे पितृत्व सिद्ध करून आरोपीला दोषी ठरविण्यात आले. याही प्रकरणात दहा वर्षाची शिक्षा आरोपीला सुनावण्यात आले तर तिसरे प्रकरण ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन हद्दीतील आहे. आई-वडील नसल्याच्या सात वर्षीय मुलीवर तिच्या आजोबांनी अत्याचार केला होता. सुधाकर पिलारे असे आरोपी आजोबाचे नाव होते. या प्रकरणात आरोपीला पाच वर्षाचा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली या तीनही प्रकरणात विशेष पास्को न्यायालयाचे न्यायाधीश अनुराग दिक्षित यांनी हा निकाल दिला असून आरोपींना शिक्षा मिळवण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड स्वाती देशपांडेे (आंंम्बाडे) यांनी सरकारी पक्षातर्फे किल्ला लढवला. एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या प्रकरणात एकाच कोर्टात दोषसिध्दीचे पहिले प्रकरण आहे लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपींना शिक्षा देण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन केल्यानंतर या कोर्टात ऍडव्होकेट स्वाती देशपांडे या एकमेव महिला वकील आहेत.