रावसाहेब दानवे च्या निषेधार्थ नाभिक समाज संघटना रस्त्यावर

रावसाहेब दानवे च्या निषेधार्थ नाभिक समाज संघटना रस्त्यावर

दिनचर्या न्युज
वणी :-
भाजप नेते तथा केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री यांनी जालन्यातील जाहीर कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात टिका टिपन्नी करीत असताना *तिन्ही पक्ष म्हणजे तिरुपती येथील न्हावी* असे विधानसभा करून एका विशिष्ट समाजाचा उल्लेख करून नाभिक समाजच्या भावना दुखविन्याच कार्य केले आहे ह्या विधानाच्या विरोधात बारा बलुतेदार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देऊन आपलं रोष व्यक्त करीत निषेध नोंदविला, केंद्रस्थानी असलेल्या सरकारचा मंत्री एका अल्पसंख्यांक जातीचा हेतू पूरस्पर उल्लेख करून ह्या जातीच्या भावना दुखवीत असताना जर जाणीव नसेल तर नवलच म्हणून अश्या नेत्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी समाजातून निवेदनाच्या माध्यमातुन केलेली आहे ह्यावेळी
*सुरेश मांडवकर, बंडूभाऊ येसेकर, प्रवीण खानझोडे, संजय गाथाडे, भास्कर गोरे,राजूभाऊ वाघमारे, रणजित घुमे पुरुषोत्तम नवघरे, दिलीप वनकर, शशिकांत नक्षीने, आकाश कडुकर, अभय नागतुरे, राजू किन्हेकर, दिवाकर नागतुरे, कवडू जमदाळे, सचिन धाबेकर,अनिल मांडवकर, गणेश वासेकर, संतोष वासणकर, दादाजी वनकर प्रमोद निंबुळकर शेकडो समाज बांधव उपस्थित होते