रा. से. यो. शिबीरातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागा होतो - ममता डुकरे




रा. से. यो. शिबीरातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागा होतो - ममता डुकरे



दिनचर्या न्युज
भिसी :
दैनंदिन व्यावहारिक जीवन जगत असतांना माणसाला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. सामाजिक दृष्टीने विकसित व्यक्ती संकटाचा सामना करून त्यावर मात करतो. विद्यार्थी जीवनातच जर रा. सेे. यो. शिबीरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळाले तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व पुढे हेच विद्यार्थी देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देतात,' असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या ममता डुकरे यांनी केले.
सोमवार 28 मार्च रोजी गडपिपरी येथे कला व वाणिज्य महाविद्यालय भिसीच्या राष्ट्रीय सेवायोजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
चिमूर स. ब. संस्थेचे संचालक संजय बोमेवार, प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी प्राचार्य कार्तीक पाटील, प्रा.डॉ.प्रकाश वट्टी, प्राचार्य डॉ. राजेंद्र जाने, सरपंच जयमाला बोरकर , उपसरपंच कल्पना हरडे , ग्रा. पं. सदस्य योगेश करारे, सरीता शामकुरे, मंगला एकवनकर, चंदूलाल पाटील,गडपिपरी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार खोब्रागडे , ललीत हरडे, मयुर श्रीरामे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. विठ्ठल ठावरी, अहवाल वाचन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनकर चौधरी, आभार प्रदर्शन प्रा.डॉ. सुनंदा चरडे यांनी केले.

दिनचर्या न्युज