आदरणीय पवार साहेब ह्यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन
आदरणीय पवार साहेब ह्यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
काल दिनांक 8/4/22 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा खा आदरणीय पवार साहेब ह्यांच्या मुंबई येथील " सिव्हर ओक" निवासस्थानावर काही समाजकंटक प्रवृत्तीच्या चिथावणीवरून एस. टी. कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जो भ्याड हल्ला करण्यात आला
त्या घटनेच्या निषेधार्थ आज शनिवार दिनांक 9/4/22 ला चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर येथील जटपुरा गेट जवळील महात्मा गांधी पुतळ्या जवळ ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य आणि शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके ह्यांच्या नेतृत्वात धरणा आणि निदर्शनांचा कार्यक्रम करण्यात आला. निदर्शनं करतांना सदावर्ते ह्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या
तसेच शरद पवार ह्यांच्या घरावर जो भ्याड हल्ला करण्यात आला ह्याच्या मागे मुख्य सुत्रदार कोण ह्याचा तपास घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर ह्यांना निवेदन देण्यात आले
आंदोलन करते वेळी जेष्ठ नेते हिराचंद बोरकुटे साहेब, दीपक जयस्वाल, ओ बी सी जिल्हाध्यक्ष डी.के. आरिकर, जेष्ठ नेते दीपक जयस्वाल, महिला शहर अध्यक्ष शालिनी महकुलकर,महादेवराव पिदुरकर, शशिकांत देशकर, सूर्या अडबाले,सुनील काळे,सूरज चव्हाण, सतीश मिणगुलवार,प्रियदर्शन इंगळे,नगरसेविका मंगला आखरे,विपील झाडे,राजू काब्रा, ज्योतीताई रंगारी,सुधाकर कातकर,प्रदीप रत्नपारखी,शरद मानकर,निमेश मानकर,धनंजय दानव,कुणाल ढेंगरे,प्रज्ञा पाटील, प्रवीण जुमडे,वंदना आवळे,अभिनव देशपांडे,नौशाद सिद्दिकी,पुजाताई शेरकी,शिल्पा कांबळे,संभाजी खेवले,निसार शेख,कुमार पॉल,विनोद लभाने, वाळके साहेब,रेखा जाधव,राजू आखरे,अमित गावंडे,राहुल देवतळे, देवा धामंगे, किसन झाडे,केतन जोरगेवार, सतीश मांडवकर,मनोज सोंनी, राहुल वाघ,पंकज मेंढे,मुन्ना तेमबुरकर,हर्षल भुरे,स्नेहल नगराळे,तुषार बिस्वास,अक्षय सुखदेव,विपील लभाने,किरण कच्चवर,मिथुन हलदार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनानंतर मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांना मा.जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या माध्यमातून या हल्याचे कारस्थान रचणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

दिनचर्या न्युज