वरात घेऊन जाणाऱ्या क्रूझर ट्रॅक्स ला भीषण अपघात 1जागीच ठार व 1 रेफर दरम्यान दगावला, 8 जण गंभीर
वरात घेऊन जाणाऱ्या क्रूझर ट्रॅक्स ला भीषण अपघात
1जागीच ठार व 1 रेफर दरम्यान दगावला, 8 जण गंभीर


दिनचर्या न्युज :-
भिसी प्रतिनिधी
लग्नाचा (पाट) आटोपून वरात भिसी वरून आंबोली येथे जात असतांना पुयारदंड गावाजवळ 3.30 pm वाजता मद्य प्राशन करून असलेल्या ड्रायवर चे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने क्रूझर गाडी क्र. Mh32 AH 0975 हिचा भीषण अपघात झाला. यामध्ये श्रीराम मानकर वय 52 या इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर कमला मानकर वय 65 हि नागपूर ला रेफर दरम्यान ऍम्ब्युलन्स मधेच मरण पावली.
तर 3 महिला 4 पुरुष व एक 5 वर्षाची छोटी असे एकूण 8 जण गंभीर जखमी असून भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, शेगाव जवळील दादापूर येथील मुलगी सोनू नन्नावरे हिचा आंबोली येथील कवडू मानकर यां मुलाशी भिसी येथील पत्रुजी दडमलं (मुलीचे भाउजी)यांच्या घरून लग्नाचा पाट ठेवण्यात आला होता. लग्नाच्या कार्यक्रम आटोपून वरात भिसीकडून आंबोली ला जात असतांना पुयारदंड गावाजवळ हा भीषण अपघात घडला.

श्रीराम मानकर (नवरदेवाचा काका )यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, व दोन मुले, तर कमलाबाई (नवरदेवाची आजी) हिच्या मृत्यू पश्चात पती, व मुलगा असा आप्त परिवार आहे.
         मानकर परिवारात लग्नाच्या दिवशी घडलेल्या या प्रकारमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    जागीच मूत्यू पावलेले श्रीराम मानकर यांचे शव उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविले असून पुढील कारवाई भिसी पो. स्टेशन चे पोलीस कर्मचारी  ठाणेदार साहेब प्रकाश राऊत यांचे मार्गदर्शनात करीत आहे.