भिवापूर वार्ड (बेनार चौक )परिसरात आढळला चंद्रकैलासचा मृतदेह


भिवापूर वार्ड (बेनर चौक )परिसरात आढळला चंद्रकैलासचा मृतदेह

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- काही दिवसापासून सतत अति मद्यप्राशन करीत असलेला व्यक्ती हा भिवापूर वार्डातील बेनार चौकात सतत फिरत असायचा. तो बाबुपेठ परिसरातील असल्याने नेहमीच्या परिसरात वावरात होता.
सूत्रांच्या माहितीनुसार मजुरीचे काम करणाऱ्या इसम असून ह्या इसमाचा मृतदेह भिवापूर वार्डातील बेनार चौकातील एका घरी आढळला. चंद्रकैलास खटूजी जांभूळकर (वय 52 वर्ष) असे मृतकाचे नाव आहे.

बाबूपेठ परिसरातील आंबेडकर नगर वार्डातील हा इसम बेनार चौकातील एका भंगार व्यावसायिकाच्या घरी राहत असून कालपासून अति मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
अति मद्य सेवन केल्याने तो झोपला तर सकाळी झोपेतून उठलाच नाही म्हणून या परिसरातील काही नागरिकांनी याची माहिती शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली.
पुढील तपास शहर पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या बागला पोलीस चौकी चे पोलीस करीत आहेत.