नागभीड तालुका काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्ष पदी राजेश बारसागडे यांची निवड
दिनचर्या न्युज :-
नागभीड :-
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील काँग्रेसचे निष्टावान कार्यकर्ते,पत्रकार, प्रसिद्ध साहित्यिक, महाराष्ट्र शासन 'बालकवी' पुरस्कृत कवी राजेश देवराव बारसागडे यांची नुकतीच नागभीड तालुका (ग्रामीण) काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर पदाच्या निवडीचे नियुक्ती पत्र माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूरचे खोजराम मरस्कोल्हे यांच्या हस्ते शनिवारी त्यांना प्रदान करण्यात आले.नागभीड तालुका (ग्रामीण )काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्ष पदाची निवड वरिष्ट स्थरावरून करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,सांस्कृतिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष व विदर्भ समन्वयक गणेश लिमजे व जिल्हाध्यक्ष सायली जयंत देठे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र त्यांना प्रदान करण्यात आले आहे.तर नागभीड तालुका (ग्रामीण )कार्यकारणीत सचिव पदी सुभाष गजबे,उपाध्यक्ष पदी तुलोपचंद गेडाम, सह सचिव पदी योगेश्वर शेंडे,सदस्य पदी पुरुषोत्तम चावरे, मधुकर टिकले, नरेश निकुरे,साहेबराव बारसागडे,ज्ञानेश मेश्राम,प्रशांत उईके,चंद्रशेखर लेंझे यांचा समावेश करण्यात आला आहे.