रत्नागिरीत ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परीषद संपन्न





रत्नागिरीत ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परीषद संपन्न :

दिनचर्या न्युज :-
रत्नागिरी :-
संपुर्ण महाराष्ट्र भोंगे आणि मशीदीत अडकलेला असताना रत्नागिरीत मात्र ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ओबीसी बहुजन परिषद घेण्यात आली . ओबीसी व्हिजेएनटी परिषदेचे कोकण प्रमुख नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक व्यंकटेश एक्झ्युकिटिव्ह हॉटेल मारुती मंदीर येथे पार पडली या बैठकीला ओबीसी व्हिजेएनटी परिषदेचे कार्याध्यक्ष कल्याणराव दळे आणि दत्ताभाउ चेचर यांनी मार्गदर्शन केले . यावेळी ओबीसी संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोहीते , कुणबी नेते ॲड सुजीत झिमण , भंडारी समाजाचे अध्यक्ष रुपेंद्र शिवलकर , तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार , मुस्लिम ओबीसीचे दिलावर गोदड , नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण चव्हाण , नगरसेविका सौ अस्मिता चवंडे, राजीव कीर ,ॲड महेंद्र मांडवकर , दिपक राउत , नगरसेवक नितीन तळेकर , शेखरकुमार भुते , शांताराम मालप , माजी नगरसेवक सलील डाफळे. नगरसेवक बंटी कीर , विनायक भाटकर , ओबीसी महिला शहरअध्यक्ष सौ शरयु गोताड , ॲड प्रज्ञा तिवरेकर , मिलिंद नार्वेकर , सुरेंद्र घुडे , ओबीसी संघर्ष समितीचे युवा अध्यक्ष कौस्तुभ नागवेकर , गजानन मयेकर , गौरव नाखरेकर , अनंत भडकमकर यांच्यासहीत मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते .
यावेळी कार्याध्यक्ष कल्याणराव दळे म्हणाले की ही ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषद राजकीय विरहीत संघटना आहे. सर्वसामान्य ओबीसी जोपर्यंत एकत्र येत नाहीत तो पर्यंत ओबीसींचा विकास होणार नाही . सर्व पक्षांच्या ओबीसी प्रतिनिधींनी एकत्र येवुन ओबीसींचे अधिकार आणि हक्क पदरात पाडुन घेतले पाहिजे . मंत्री विजय वड्डेटीवार हे ओबीसींच्या हक्कांसाठी आपले मंत्रीपद सुद्धा दावणीवर लावण्यास तयार आहेत . सगळ्यांना सोबत घेवुन ओबीसींना न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे .
    नविनचंद्र बांदिवडेकर यांनी   सांगितले की  मंत्री विजय वडेट्टीवार हे स्वताला ओबीसी कार्यकर्ता समजतात . त्यांनी स्वताच्या हिमतीवर सर्व काही मिळविलेले आहे .  ओबीसी समाजाला एक हुकमी डॅशिंग नेतृत्व वडेट्टीवारांच्या रुपाने लाभलेले आहे. त्यांनी कोकणची जबाबदारी माझ्यावर दिली आहे त्यासाठी मी रत्नागिरी पासुन सुरुवात केली आहे कारण रत्नागिरी जिल्हा ओबीसींच्या विषयावर जागरुक आहे फक्त त्यांना ताकद देणे आवश्यक आहे . गावोगावात जावुन ओबीसींची संघटनेची वीण घट्ट केली पाहिजे .
         या बैठकीची प्रlस्तावना रघुवीर शेलार यांनी केली तर  सर्व ओबीसी संघटना एकत्र येवुन आपले प्रश्न सोडविण्यास सुरुवात करु असे सुचीत करुन उपस्थितांचे युवाप्रतिनिधी केतन पिलणकर यांनी आभार मानले .