तृतीयपंथीयांनी ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
तृतीयपंथीयांनी ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 7 जून : जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना केंद्र शासनाच्या नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे असल्याने जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची कागदपत्रासह माहिती आवश्यक आहे.

त्याकरीता तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे, संघटनेचे प्रतिनिधीं किंवा स्वतः तृतीयपंथी व्यक्तीने सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, चंद्रपूर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधून तृतीयपंथी असल्याबाबतचे वैयक्तिक व रहिवासी पुराव्याबाबतची माहिती त्वरित सादर करावी. जेणेकरून आपल्या माहितीच्या आधारे नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या पोर्टलवर आवश्यक माहिती भरून तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येईल.

तरी, तृतीयपंथीय व्यक्तींनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

दिनचर्या न्युज :-