ओबीसी आरक्षणशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नये व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा --डी. के. आरीकर
ओबीसी आरक्षणशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नये व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा --डी. के. आरीकर

चंद्रपूर :-          
-- या देशाच्या विकासात ओबीसी समाजाचं फार मोठं योगदान आहे. तर ओबीसी हा या देशाचा कणा आहे. तरीपण या राज्यात ओबीसी आरक्षणशिवाय नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, व पंचायत समिती च्या निवडणुका घेऊन ओबीसी समाजाला निवडणुकापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे अगोदरच ओबीसी समाजात कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.                                     
 आता पुन्हा राज्य निवडणूक आयोगाने 17 जिल्ह्यातील 92 नगर पालिका व 4 नगर पंचायत निवडणुकाणच्या घोषनेने ओबीसी आरक्सणाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.                       
 परंतु जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही व ओबीसी चे आरक्षण पक्के होत नाही तोपर्यत कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हा अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त यांच्याकडे एका निवेदणाद्वारे केली आहे.                
 निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकांचा 18आगस्ट रोजी मतदान तर 19 आगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. परंतु ओबीसी आरक्षणशिवाय निवडणुका होणे म्हणजे 52 टक्के ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे असेही डी. के. आरीकर म्हणाले. सरकारने नेमलेल्या बांठीया आयोगाने सुद्धा ओबीसी चा इंपेरीकल डाटा गोळा करून अहवाल सादर केला आहे.        आणि म्हणून ओबीसी आरक्षणशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल जिल्हा चंद्रपूर च्या वतीने भारताचे निवडणूक आयुक्त व राज्याचे निवडणूक आयुक्त यांना जिल्हा धिकाऱ्यां मार्फत एका शिष्टमंडळा मार्फत निवेदन देऊन केली आहे.                                 
  निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात ओबीसी सेल चे जिल्हा अध्यक्ष डी. के. आरीकर, प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष राजू कक्कड, युवक जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, युवती शहर उपाध्यक्ष स्वाती दुर्गमवार यांची उपस्थिती होती. 


दिनचर्या न्युज