प्रशिक्षक परशुराम मेंढे यांचा जलतरण तलाव परिवारातर्फे हृदयस्पर्शी सत्कार !

प्रशिक्षक परशुराम मेंढे यांचा जलतरण तलाव परिवारातर्फे हृदयस्पर्शी सत्कार !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिकेच्या चंद्रपूर शहरातील एकमेव असलेल्या अब्दुल कलाम बगीच्यातील जलतरण तलावाचे संचालक तथा प्रशिक्षक परशुराम मोतीरामजी मेंढे यांनी आज बुधवार दिनांक 31/8/2022 ला (व्हॅलेंटाईम रिटायरमेंट) स्व:च्छा निवृत्ती घेतली.
त्यांनी आपल्या वयाच्या 56 व्या वर्षापर्यंत सेवारत कार्य केले. हिवाळा, उन्हाळा ,पावसाळा कुठल्याही अडीअडचणीत असताना. जलतरण सुरू ठेवण्याचा  भरभरून प्रयत्न केला. अशा या जलतरण तलावाचे प्रशिक्षक परशुरामजी मेंढे यांचा अब्दुल कलाम गार्डन     जलतरण तलावाच्या परिवारातर्फे त्यांचे पुष्पगुच्छ  देऊन हृदयस्पर्शी सन्मान करण्यात आला.  त्यांच्या उर्वरित  आयुष्य सुख ,समृद्धीचे आनंदित जावो' यासाठी तलावात  पोहण्यासाठी  येणाऱ्या प्रत्येक स्नेही, मित्र परिवाराकडून त्यांना  त्यांच्या  आनंदी जीवनासाठी खूप खूप
 शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी साळवे साहेब, विजय पराते, शरद गुप्ता, राजेश पटेल, मेश्राम गुरूजी, दिनेश एकवनकर, रमेश सोनटक्के, सुरज  आकनपल्लीवार,समाधान, मुरली अन्ना, अँड. केळकर साहेब यांच्यासह 
 जलतरणासाठी येणाऱ्या नागरिकांनची उपस्थित होती.