राज्य उत्पादन शुल्क विभागाची अनुज्ञप्ती तपासणी मोहीम शहरातील रेस्टोरंन्ट बार सकाळी सहा ते रात्री जास्त वेळेपेक्षा सुरू....




राज्य उत्पादन शुल्क विभागाची अनुज्ञप्ती तपासणी मोहीम

शहरातील रेस्टोरंन्ट बार सकाळी सहा ते रात्री जास्त वेळेपेक्षा सुरू....


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला चंद्रपूर शहरातील एफएल- 3 बार अँड रेस्टॉरंट हे विहित वेळेपेक्षा जास्त वेळेपर्यंत सुरू राहतात. तसेच बियर शॉपी अनुज्ञप्तीमध्ये ग्राहक अनुज्ञप्तीमध्ये बसून बिअर प्राशन करतात, असे निवेदन व तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या होत्या. त्याअनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चंद्रपूर शहर व तालुक्यातील विविध ठिकाणच्या बिअर शॉपीची तपासणी केली असता 5 बियर शॉपीमध्ये ग्राहक बिअर पीत बसलेले आढळले. सदर अनुज्ञप्तीवर नियम भंगाचे प्रकरण नोंदविण्यात आले असून पुढील नियमानुसार कार्यवाही सुरू आहे. सदरची कार्यवाही रात्री 7:30 ते 12:30 पर्यंत सुरू होती.

मौजे देवाडा, चंद्रपूर येथे अवैधरीत्या देशी मद्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एका इसमास दारू विक्री करताना अटक करण्यात आली असून दारूबंदी कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वरोरा तालुक्यामध्ये गस्त घातली असता वरोरा शहरातील 2 एफएल-3 बार अँड रेस्टॉरंट वर तसेच 3 बियर शॉपी अनुज्ञप्तीवर कार्यवाही करण्यात आली. शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर 1 लाख 14 हजार विदेशी व 1 लाख 26 हजार देशी, एक दिवसीय मद्यसेवक परवाने निर्गमित करण्यात आले असून त्यापासून 8 लक्ष 22 हजार इतका महसूल शासनास प्राप्त झालेला आहे.

जिल्हात दारू बंदी उठल्यानंतर बिअर बार रेस्टोरंन्टला परवानगी देण्यात आली. मात्र शहरातील अनेक बियर बार रेस्टोरंन्ट हे नियमाला धाब्यावर बसवून सकाळी सहाच्या आत मागील दाराने उघडले जातात. आणि रात्री उशिरा पर्यंत सुरू असतात. अशी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती असताना सुद्धा कुठल्याही कारवाई केली जात नाही. उलट 'मि मारल्या सारख्या करतो, तु रडल्यासारखे कर' ! अशी परिस्थिती या विभागातील अधिकारी-याची आहे.


सदर कामगिरी चंद्रपूर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक एम. एस. पाटील, श्री. थोरात, श्री.वाघ, श्री. लिचडे, दुय्यम निरीक्षक अमित क्षीरसागर, जगदीश पवार, श्री. खांदवे, श्री. राऊत,श्री. भगत तर सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. खताळ यांनी पार पाडली.

दिनचर्या न्युज