गोंडपिंपरी आष्टी मार्गावर झाड कोसळले, नदीच्या पुलावर पाणी असल्याने वाहतूक बंद दोन्हीकडे प्रवाशांची तारांबळ!




गोंडपिंपरी आष्टी मार्गावर झाड कोसळले, नदीच्या पुलावर पाणी असल्याने वाहतूक बंद दोन्हीकडे प्रवाशांची तारांबळ!


दिनचर्या न्युज :-
गोंडपिपरी:-
काल रात्रीपासून सुरू असलेल्या सतत मुसळधार पावसामुळे चंद्रपूर अहेरी मार्ग बंद पडला . चंद्रपूर गोंडपिपरी मार्गावर रस्त्यावर पाणी साचले व वादळ वाऱ्याने गोंडपिपरी पासून 12 km अंतरावर मोठे झाड कोसळल्याने सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 पर्यंत वाहतुकीची दुतर्फा कोंडी झाली होती. त्यामुळे प्रवाशांना बराच फटका बसला. वेळ आणि संततधार पावसामुळे नाहक त्रास सहन करीत प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. सकाळी सहा वाजता
चंद्रपूर वरून सकाळी अहेरी करीता जाण्यासाठी जमलेले प्रवासी 8 वाजल्यानंतर जेव्हां नागपूर अहेरी करीता जाण्यासाठी प्रवासी बसले.  



गोंडपिपरी आष्टी मार्गाने जाणाऱ्या  मुख्य मार्गावर फार मोठे झाड कोसळले. त्यामुळे पाच ते सहा घंटे वाहतुकीस दोन्हीकडून खोळंबा झाला. काही वेळाने प्रवासांच्याच
मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र  आष्टी मार्ग  सतत सुरू असलेल्या पावसामुळे  नदिच्या पुलावर पाणी वाहत असल्यामुळे  आष्टी वरून अहिरे जाणारा मार्ग पूर्णता बंद करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना परतीचा मार्ग पकडून आर्थिक, शारीरिक ,मानसिक त्रास सहन करून  वापस   परत यावं लागलं. आष्टी पासुन अहेरी आलापल्ली करिता बंद असलेला मार्ग गोंडपिपरी बसस्थानकावर ऐकून हिरमुसले हे अत्यंत न पचणारे दृष्य गोंडपिपरी बसस्थानासमोर प्रवाशांना बघायला मिळाले.
 ऐकिकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करीत असताना. हर घर तिरंगा ह्या प्रकल्पाचा गाजावाजा करीत   आहे .मात्र  चंद्रपूर  जिल्ह्यापासून  वेगळा झालेल्या गडचिरोली जिल्ह्याला ये जा करण्यासाठीं रस्ते बरोबर नाही हयापेक्षा मोठे दुर्भाग्य काय असू शकते. उद्या एकीकडे जागतिक आदिवासी (मूलनिवासी) दिन तथा क्रांती दिन असताना दोन्ही जिल्हयाच्या आपापसातील आनंद उत्सव साजरा करण्यासाठी कोरोना मुळे प्रताडित होवून आतूर दिसत असलेल्या जनतेला   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 
 निमित्ताने  सर्व समाज घटकातील नागरिकाला स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंदोत्सव करण्यात आनंद राहील ?