समीक्षा मांडवकर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समिती च्या वर्धा जिल्हा संघटक पदावर नियुक्ती

समीक्षा मांडवकर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समिती च्या वर्धा जिल्हा संघटक पदावर नियुक्ती        

दिनचर्या न्युज :- 
वर्धा (प्रती.) समुद्रपूर येथिल एक सामाजिक कार्यकर्त्या सौ. समीक्षा मांडवकर यांचे पर्यावरना साठी केलेले उल्लेखनीय काम पाहून पर्यावरण संवर्धन व विकास समिती च्या वर्धा जिल्हा संघटक पदावर समितीचे संस्थापक अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक, तशेच प्रसिद्ध पत्रकार डी. के. आरीकर यांच्या हस्ते हिंगणघाट येथिल रायगड हॉटेल येथे झालेल्या सभेत नियुक्ती पत्र देण्यात आले. नियुक्ती पत्र देतेवेळी विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा रडके, वर्धा जिल्हा अध्यक्ष विनोद सातपुते , शिला सोनारे, नमिता पाठक, श्रीकांत पाल, राजू सावरकर, दिक्षा बहादे, लक्ष्मी सोनटक्के, राहुल सुरकर, साधना ठावरी, गणेश बहादे, पंकज दोडके, रवींद्र येणोरकर, व राहुल कहूरके आणि अनेक पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. त्याच्या नियुक्ती बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.