गुरुदास कामडी नेशन बिल्डर्स अवॉर्डने सन्मानित

गुरुदास कामडी नेशन बिल्डर्स अवॉर्डने सन्मानित


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
रोटरी क्लब बल्लारपूरच्या वतीने दरवर्षी 5 सप्टेंबर ला शिक्षक दिनानिमित्त नेशन बिल्डर अवार्ड हा पुरस्कार प्रदान करीत असते. जिल्ह्यातील उपक्रम शिक्षक यांच्या या निमित्ताने सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येतो.यावर्षी नेशन बिल्डर पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 10 सप्टेंबर 2022 ला हॉटेल स्केवर पॉईंट बल्लारपूर येथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. आनंद झुनझूनवाला,असिस्टंट गव्हर्नर महेश उचाके , मा. रवींद्र लामगे, गटशिक्षणाधिकारी बल्लारपूर , प्रफुल्ल चरपे क्लब प्रेसिडेंट ,महेश कायरकर ,,राहुल वुरी क्लब सेक्रेटरी प्रोजेक्ट बल्लारपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.बल्लारपूर तालुक्यातील जिल्हा परिषद,नगर परिषद वखाजगी शाळेतील ९ उपक्रमशिल शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यात सन्मित्र सैनिक विद्यालय चंद्रपूर येथील उपक्रमशिल शिक्षक गुरुदास कामडी यांना नेशन बिल्डर अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गुरुदास कामडी सन्मित्र सैनिकी विद्यालय चंद्रपूर येथे २२ वर्षापासून अध्ययन-अध्यापनाचे कार्य करित आहेत. कोरोना काळात भूगोल विषयावर आधारित youtube चैनल, झूम मीटिंग, डिजिटल व्हिडिओ निर्मिती या माध्यमातून शिक्षणाचे सातत्य टिकवून ठेऊन आनंदाई शिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अध्यापनात रुची निर्माण केली होती. या उपक्रमाबद्दल गुरुदास कामडी यांना नेशन बिल्डर अवार्डने सन्मानित करण्यात आलेले आहे.
यापूर्वी ही गुरुदास कामडी यांना सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा बेस्ट टिचर्स अवार्ड २०१२, महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, दैनिक लोकशाही वार्ता समुहाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गरुदास कामडी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच सिनेट सदस्य सुध्दा राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे नवनियुक्त सदस्य आहेत.
गुरुदास कामडी यांना रोटरी क्लब बल्लारपूर कडून नेशन बिल्डर्स अवार्ड सन्मानित केल्याबद्दल भाजप महानगर जिल्हा महामंत्री राजेंद्र गांधी, भाजप शिक्षक आघाडीचे रंजीव श्रीरामवार, प्रा.अरुण राहंगडाले, श्रीकांत कुमरे,प्रा.पुंजाराम लोडे,जयंत गौरकर शरदराव गिरडे म.रा.शि.प.चे दिवाकर पुद्दटवार, देवेंद्र कंर्चालावार, सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार, यश बांगडे,सो.किरण गजपूरे सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या प्राचार्या अरुधंती कावडकर आदींनी अभिनंदन केले आहे.

दिनचर्या न्युज