कलकाम रिअल इस्टेट कंपनीच्या पदाधिकारी व स्वरक्षण देणा-या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा -रत्नमाला चहारेकलकाम रिअल इस्टेट कंपनीच्या पदाधिकारी व स्वरक्षण देणा-या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा -रत्नमाला चहारे


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडे करणार न्यायाची मागणी

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील गडचिरोली यवतमाळ व नागपूर या जिल्ह्यातील १०० कोटीपेक्षा जास्त रुपयांनी गुंतवणूकदारांची कलकाम रिअल इन्फ्रा (ई) लि. या कंपनीच्या संचालकांनी फसवणूक केली आहे. व त्या संचालकाना आपल्याच मनसे पक्षातील लोकांनी सन २०१७ पासून संरक्षण देऊन आम्हच पैसे कंपनी कडून परत मिळविण्यास अडथळा निर्माण केला आहे. या संदर्भात आम्ही मुंबई येथील आपले मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संजय जाधव, नंदू घाडी व मनसे महिला राज्य उपाध्यक्षा रिटा गुप्ता यांच्याकडे हैं प्रकरण दिले पण त्यांनी या प्रकरणा संदर्भात स्थानिक चंद्रपूर संपर्क अध्यक्ष सचिन भोयर यांच्याकडे प्रकरण सोपवल पण मनसेचे पदाधिकाऱ्यांरी ते याच्यासोबत मिळून असल्याने त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं त्यामुळे पर्याय नसल्याने आम्ही वरोरा भद्रावती विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्याकडे प्रकरण सोपवले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे या प्रकरणी तक्रार करून कंपनीच्या संचालक व अधिकारी यांच्यावर एम.पी.आय.डी. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करायला लावून सर्व संचालकांना अटक करायची मागणी लावून धरली त्यानंतर कंपनीच्या एकाला अटक करण्यात आली मात्र मुख्य आरोपी पर्यंत पोलीस पोहचले नाही, दरम्यान कलकाम च्या गुंतवणूकदारांची बाजू घेतली म्हणून राजू कुकडे यांच्यावर भर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हल्ला केल्याने त्यांनी या प्रकरणातून माघार घेतली. त्यामुळे काही दिवसांपूर्वी चंद्रपूर दौऱ्यावर आलेल्या रिटा गुप्ता यांना आम्ही परत निवेदन देऊन आम्हांला न्याय मिळवून या अशी विनंती केली तर त्यांनी जनहित विधी कक्ष विभागाच्या जिल्हाध्यक्षा ॲड मंजू लेडांगे यांच्याकडे हे प्रकरण सोपवलं मात्र त्या सुद्धा संपर्क अध्यक्ष सचिन भोयर यांच्या सोबत असल्याने आम्हांला मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून न्याय मिळू शकला नाही त्यामुळे आपण आम्हांला न्याय मिळवून न्याय मिळवून द्यावा .कारण आम्ही जिल्ह्यातील जवळपास 10 हजारांपेक्षा जास्त गुंतवणुकदार आपल्याकडून न्यायाची आस घेऊन बसलो आहे..

चंद्रपूर शहरात सपना टाकीज समोर असलेल्या विदर्भाच्या कंपनी कार्यालयाला कुलूप लागले आहे. या कंपनीविरोधात जिल्ह्यातील गडचांदूर, कोरपना, राजुरा बल्लारपूर, मूल, ब्रम्हपुरी, भद्रावती, चंद्रपूर, घुग्गुस येथील कंपनीच्या एजंट व गुंतवणूकदारांनी आपआपल्या सोयीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी करून कंपनीचे विष्णू पांडूरंग दळवी, सि.एम.डी. कलकाम रिअल इन्फा (इं) लि. मुंबई, विजय सुपेकर (डेव्हलपमेंट डायरेक्टर) मुंबई. सुनिल वांद्रे (डेव्हलपमेंट डायरेक्टर) मुंबई. मुंबई) अनिल पासवान विदर्भ युनिट प्रभारी कलकाम (रा. ५) महमद इदरीस विदर्भ युनिट प्रभारी कलकाम (रा. मुंबई) विजय वासुदेव येरगुडे विदर्भ प्रभारी रा. चंद्रपूर विदेश प्रभाकर रामटेके विदर्भ प्रभारी रा. चंद्रपूर किसन मोतीराम पेंदोर रा. राजूरा व या सर्वाना साथ देणाऱ्या मनसे पदाधका-यावर एमपीआयडी काययाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असले तरी त्या सर्वाना अटक झाली नाही. व आपल्या पक्षातील गुंडाकडून आम्हच्या जिवाला धोका आहे त्यामुळे आपण याबाबत त्वरीत दखल घेऊन आम्हांला न्याय द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेतून आज रत्नमाला चहारे मंगला लोनारे,मुरीधर गिरडकर,पदधमिनी,रत्नमाला गायकवाड ,पायल तेलंग, त्यांच्यासह अनेक अन्यायग्रस्त गुंतवणूकदारांनी केली आहे.