... आम्ही, राज ठाकरे यांना मित्र म्हणून भेटायला जातो, राजकीय चर्चेसाठी नाही- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकाराची साधला संवाद




... आम्ही, राज ठाकरे यांना मित्र म्हणून भेटायला जातो, राजकीय चर्चेसाठी नाही-

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकाराची साधला संवाद

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यांदा चंद्रपूर दौऱ्यावर आले असता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमावर व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज्यात सोळा मतदार केंद्रासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री
हरजदीप सिंग पुरी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे लोकसभेच्या निवडणुकीचे कामकाज चालणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव करीत महाराष्ट्रात काँग्रेसची शीट जिंकण्यात बाळू धानोरकर यांना ऐश आले होते. भारतीय जनता पक्षाला चंद्रपूर लोकसभेतील पराभव हा आला होता. मात्र परत भाजपाने मैदानात जोमाने ने उडी घेतली आहे. त्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या संदर्भात केंद्रीय राज्य मंत्री मंडळाचे नेते  2024 ते 29 या होणाऱ्या लोकसभेची  निवडणुकीसंदर्भात सर्व राज्यात पक्षाच्या संघटनात्मक बैठका, याच बरोबर विधानसभा होणाऱ्या  निवडणुका संदर्भात  21 कार्यक्रम राहणार आहेत.  या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या विकास लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम या प्रवासादरम्यान केले जाणार आहे.
या कार्यक्रमात सदरच्या  तीन दिवसात  बैठका होणाऱ्या  .या बरोबर आताच बैठकीत  पक्षाचे नेते सवाद साधल्या जात आहे. दिनांक 22 ते, 24 सप्टेंबरला केंद्रीय मंत्री दौर्‍यात सहभागी होणार आहे. त्यासंदर्भात राजकीय संघटनात्मक बैठका घेतल्या जात आहे. अशी माहिती आज पत्रकारासी  संवाद  साधताना दिली.
भारतीय जनता पक्षाचे  प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार का? यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न केले असता. आम्ही राज ठाकरे यांना मित्र म्हणून भेटायला जातो . राजकीय चर्चेसाठी नाही. भाजपाच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या घराचे दरवाजे ठोठावले असताना. संबंध महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात   युती होणार का? यासंदर्भात संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे. कशाचं केंद्रीय मंत्री मंडळाचे राज्याचे गृहमंत्री  अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पाच तारखेला येत असल्याने ते ही राज ठाकरेच्या भेटीला जात असल्याने आणखीनच राजकारणात वेगळे वळण होत असल्याची चर्चा होत आहे. मात्र राज्याचे  वन व  सांस्कृतिक मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट म्हटले आहे की, राज ठाकरे च्या घरी जाणे, किंवा भेटणे याचा अर्थ युती होणे ,नसून ! त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे नेतेही मैत्रीच्या नात्याने जात असतात. काही केले तरी महाराष्ट्रात   मनसेसोबत   युती होऊ शकत नाही. कारण आमचे आणि राज साहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचारू विनिमय वेगळे असतात. त्यामुळे राज महाराष्ट्रात युती होणे शक्य नसल्याचे स्पष्ट संकेत सुधीर मुनगंटीवार यांनी आज झालेल्या पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हटले.
महाराष्ट्रात होणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती ,जिल्हा परिषद    पुढे येणाऱ्या लोकसभा, विधानसभा या निवडणुका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गटबंधन करून भाजप संपूर्ण महाराष्ट्रात एक हाती सत्ता स्थापन करेल अशी आशा व्यक्त केली.
यावेळी पत्रकार परिषद भाजपाचे प्रांत अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार,  खासदार अशोक नेते,माजी खासदार हंसराज अहिर, आमदार  किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया, माजी आमदार संजय धोटे,  त्यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.