भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांची भूमिका अत्यंत महत्वाची -डी. के. आरीकर

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांची भूमिका अत्यंत महत्वाची -डी. के. आरीकर

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (प्र.)दि.2         
    महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गानी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवाचे रान केले. स्वतंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधी यांची भूमिका अतिशय महत्वाची होती असे विचार पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांनी चंद्रपूर येथिल वनविभाग च्या विश्राम गृहात महात्मा गांधी व माजी पंतप्रधान मा. लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती कार्यक्रमात 2 आक्टोबर 2022ला व्यक्त केले.                   त्याचप्रमाणे लालबyहाद्दूर शास्त्री यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून देशाला प्रगती पथावर नेण्याचे अतिशय मोलाचे कार्य केले. असेही डी. के. आरीकर म्हणाले.तर या दोन्ही भारत रत्नानी देशासाठी मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे भारत देश त्यांना कधीही विसरणार नाही. असेही डी. के. आरीकर म्हणाले.                                       सर्व प्रथम महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.                         या जयंती कार्यक्रमाला पर्यावरण संवर्धन व विकास समिती चे अध्यक्ष डी. के. आरीकर, सचिव हरीश ससणकर, हरीश साहनी, महिला अध्यक्ष वर्षाताई कोठेकर, वनश्री मेश्राम, प्रवीण जुमडे, राणी येलेकर, व सुनील ढेकले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. जयंती कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीश ससणकर यांनी संचालन प्रवीण जुमडे यांनी व आभार राणी येलेकर यांनी मानले व कार्यक्रमांची सांगता झाली.

दिनचर्या न्युज