डिजिटल मीडिया असोसिएशन तर्फे नवनियुक्त पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचा सत्कार
डिजिटल मीडिया असोसिएशन तर्फे नवनियुक्त पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचा सत्कार


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपुरात नुकतेच रुजू झालेले पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची डिजिटल मीडिया असोसिएशन
चंद्रपूर शिष्टमंडळाने भेट घेतली. व त्यांचा सिक्रेट नावाचे पुस्तक  व गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष जितेंद्र चोरडिया तसेच प्राध्यापक विजय सिद्धावर यांनी सोशल मीडिया चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून कार्यरत असून डिजिटल मीडिया द्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्या, आणि त्यातून वाचकांना मिळणारा भरभरून प्रतिसाद सोशल मीडिया वाढत असून. यामुळे सोशल मीडियाचे महत्व वाढल्याचे नमूद केले. शहरात होणाऱ्या समस्या, तसेच गुन्हेगारीवर आळा घालावा. शहरातील सुव्यवस्था , शहरातील वाहतूक कोंडी व इतर समस्या बाबत माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करण्यात आली. प्रशासन पोलीस प्रशासनाला पत्रकारांची साथ, तसेच पोलीस विभागातून निघणाऱ्या बातम्या प्रसारित करणे व जनतेला शांतता व सुव्यवस्था बाधित राखण्याचे कामही पोलीस विभागाबरोबर पत्रकाराची मुख्य भूमिका असते.
 . असे  जिल्ह्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी  आपले मत व्यक्त केले.  त्यावेळी डिजिटल मीडिया  असोसिएशनचे  जितेंद्र चोरडिया, विजय सिद्धांवार, राजू बिट्टूरवार, जितेंद्र जोगड, दिनेश एकवणकर, अरुण वासरवार, तुळशीराम जांबुळकर, दीपक शर्मा, मनोहर दोत्तपल्ली, राजेश नायडू, मुन्ना तावाडे, धम्मशील शेंडे, नरेंद्र डोंगरे, प्रशांत रामटेके,तनशील पठाण.संपादक,पत्रकार ,संघटनेचे सदस्य उपस्थित होते.