एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेजमध्ये नवरात्री उत्सव २०२२ अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.





एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेजमध्ये नवरात्री उत्सव २०२२ अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
फिमेल एज्युकेशन सोसायटी, चंद्रपूर द्वारा संचालन एफ ई. एस. गर्ल्स कॉलेजच्या सांस्कृतिक व शैक्षणिक विभागाच्या वतीने न संस्थेचे अध्यक्ष मा. अॅड. श्री विजय मोगरे यांच्या प्रोत्साहनाने नवरात्री उत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले. हा उत्सव मोठ्या थाटात पार पडला.या उत्सवाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. मिनाक्षी ठोंबरे तसेच नृत्य प्रशिक्षक श्री. रोहित तुराणकर, श्री रितीक चाफले, श्री. शुभम गोविंदवार मिस्टर इंडिया २०२२, महाविद्यालयातील रासेयो अधिकारी डॉ. राजेंद्र बारसागडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या नवरात्री उत्सव २०२२ मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी एकल नृत्य, समुह नृत्य, कारबा, शोह सादर केले .विद्यार्थिनींनी सादर केलेला' गोधर' हे या उत्सवाचे विशेष आकर्षण होते. त्यातून महाराष्ट्राची लोककला व संस्कृतीचे दर्शन घडवून ती संवर्धित करण्याचा महत्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. या उत्सवाला महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

'नवरात्री उत्सव २०२२' चे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक न शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. कल्पना कावळे, यांनी केले. या उत्सवाचे यशस्वी आयोजन सांस्कृतिक व शैक्षणिक विभागाचे डॉ कल्पना कावडे, डॉ. सुवर्णा कायरकर, डॉ. मेघमाला मेश्राम, प्रा. अशोक बनसोड, क्रीडा विभागाचे डॉ. आनंद वानखेडे यांनी केले.

या सांस्कृतिक कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.