चंद्रपूरचे नवीन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग एस परदेशी लवकरच पदभार सांभाळणार!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न यामधील तरतुदींनुसार, पुढील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये नमूद भा.पो.से./रा.पो.से. अधिका-यांची, स्तंभ (३) मध्ये नमूद पदांवरुन, स्तंभ (४) मध्ये निर्दिष्ट पदांवर, याद्वारे, बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे:
रवींद्रसिंग एस परदेशी यांची चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जुने पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची बदली करण्यात आली असून त्यांना सध्या कुठलाही पदभार देण्यात आला नसून. त्यांच्या जागी नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून रविंदसिंग एस. परदेशी हे लवकरच पदभार सांभाळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
चंद्रपुरात आतापर्यंत वाढलेल्या गुन्हेगारीत, अवैध धंद्यांना, आळा घालतील अशी आशा चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आहे.