ताडोबात स्थानिकांना समोर करून बाहेरील नागरिकाच्या जिप्सी सफारीत !




ताडोबात स्थानिकांना समोर करून बाहेरील नागरिकाच्या जिप्सी सफारीत !

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

ताडोबा अंधेरी वाघ प्रकल्प द्वारे ताडोबा जंगल क्षेत्रांतील स्थानिकांना रोजगार उपलब्द करून देण्यासाठी ताडोबा जंगल सफारी साठी अनेक जिप्सी लावण्यात आल्या .परंतु यातील अनेक जिप्सी बाहेरील नागरिकांच्या असून त्यातून स्थानिकानाच डावलण्यात येत असल्याची तक्रार मोहोर्ली येथील स्थानिक नागरिकांनी ताडोबा प्रशासनाला केली आहे.ताडोबा प्रशासनाने ताडोबा जंगल क्षेत्रात स्थानिकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने जंगल सफरीला लागणाऱ्या जिप्सी चालवण्याची मुभा दिली.

त्यात ताडोबा प्रशासनाद्वारे स्थानिक ग्रामपंचायतींना लाभार्थी निवडण्याचे अधिकार देण्यात आले.सोबतच स्थानिकाशी समन्वय साधण्यासाठी ताडोबा प्रशासनाने EDC समिती बनवली.या समिती आणि ग्रामपंचायातीने घेतलेल्या ठरावानुसार 25 वर्षांपासून स्थानिक लोकांच्या वाहनांना जंगल सफरीला परवानगी देण्यात आली.तसेच मोहोर्ली ग्रामपंचायतीने दि 4 सप्टेंबर 24 ला एक कुटुंब एक रोजगार उपलब्द देण्याचा ठराव पारित करण्यात आला.

परंतु मोहोर्ली ग्रामपंचायतीने आणि ताडोबा प्रशासनाच्या संगमताने मोहोर्ली गावातील स्थानिकांना डावलून बाहेरील व्यक्तींना जिप्सी चालविण्याची परवानगी देण्यात आली ,सोबतच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि निकटवर्तीय यांना एकाच कुटुंबात अनेकांना रोजगार देण्यात आला.

यात चंद्रपूर तसेच बाहेरील रिसोड धारकांनी स्थानिकांना सामोर करून जिप्सी खरेदी केले आहेत. नाम मात्र त्या जिप्सीवर सफारीसाठी स्थानिकाचा वापर करण्यात येत आहे. डल्ला मात्र बाहेरचे नागरिक मारत आहेत. अनेक जिप्सी नियमबाह्य सुरू आहेत. याची चौकशी होऊन संबधीत नियम बाह्य चालणाऱ्या जिप्सी धारकावर कारवाई करण्यात यावी.

तसेच या जंगल परिसरात सफारीसाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक जिप्सी ह्या राज्य परिवहन विभागाच्या

नोंदणी केलेल्या नाहीत. संबंधित जिप्सीने एखादा अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार कोण?

त्यामुळे स्थानिक युवकांना आणि नागरिकांना बेरोजगार झाले आहे.ग्रामपंचायत मोहोर्ली द्वारे 27 सप्टेंबर 21 ला ताडोबात चालणाऱ्या जिप्सी धारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यात 28 स्थानिक आणि 31 गैर स्थानिक जिप्सी मालकांची नोंद आहे.

त्यामुळे मोहोर्ली येथील स्थानिक रहिवाशी बुद्धिवान नावघरे,भीमराव दुर्योधन,रत्नमाला बोरकर,वनमाला गाऊत्रे, हनुमान गाऊत्रे, प्रवीण पेंदाम यांनी गैर स्थानिकांच्या जिप्सी ताडोबा पर्यटनास बंद करून स्थानिकांच्या जिप्सी लावून स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी ताडोबा प्रशासनाला केली आहे.


स्थानिक ग्रामपंचायतीने दिलेल्या परवानगीने ताडोबा क्षेत्रात जिप्सी धारकांना परवानगी दिली जाते .त्यात एखादी स्थानिकांची जिप्सी लागली नसल्यास त्यांनी या संबंधास ग्रामपंचायतीचे अनुमती पत्र विभागाला दिल्यास त्यांची जिप्सी लगेच लावण्यात येईल.

Dr Prabhunath Shukla,

वन संरक्षक व क्षेत्र संचालक ,TATR

या संबंधात ग्रामपंचायत मोहोर्ली येथे तक्रार आलेली आहे,त्या अनुषंगाने येत्या मंगळवार दि 19 ऑगस्ट ला सभा आयोजित केली आहे,त्यात ग्रामसभेसमोर हा विषय मंडण्यातयेईल.

खनके मॅडम ग्रामसेवक ,मोहोर्ली