जांर्भल्यात कोंबड बाजारावर पोलिसांची धाड पंधरा कोंबडे,सात वाहनासह लाखोंची मालमत्ता जप्त





जांर्भल्यात कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

पंधरा कोंबडे,सात वाहनासह लाखोंची मालमत्ता जप्त

दिनचर्या न्यूज:-

चंद्रपूर:-

पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत मौजा जांर्भला गावाचे तलावाजवळ अवैधरित्या कोंबडयाच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्याविरुध्द कारवाई करण्यात आली.

तीन आरोपी अटक, १५ कोंबडे, ७ वाहने व नगदी असा एकुण ५,८८,१००/- रु.ची मालमत्ता जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी करीत आरोपींना अटक केली.

ही कारवाई दिनांक १७ ऑगस्ट, २०२५ पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील मौजा जांर्भला गावाचे तलावाजवळ काही ईसम अवैधरित्या कोंबडयाच्या झुंजीवर पैशाची बाजी लावुन हार-जित चा जुगार खेळत असल्याच्या गोपनिय माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने सदर ठिकाणी छापा घातला असता सदर ठिकाणी आरोपी नामे (१) फारुख बहादुर शेख वय ३८ वर्ष रा. चंद्रपूर (२) मुकेश नामदेव दशमवार वय ४६ वर्ष रा. जुनोना चौक, बाबुपेठ वार्ड चंद्रपूर (३) राजसिंग बहादुरसिंग पटवा वय ३५ वर्ष वार्ड क्र. १७ शिवाजी चौक मुल असे तिघे मिळून आले तसेच सदर ठिकाणी एकुण १५ कोंबडे (ज्यात ३ मृत पावलेले व धारदार कात्यांनी जखमी) एकुण ०६ मोटार सायकल व नगदी १५,५००/- असा एकुण ५,८८,१००/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आले. सदर आरोपींना विचारपूस केली असता सदर कोंबड बाजार हा नामे विशाल गावंडे रा. अजयपुर हा चालवित असल्याचे सांगितले. सदर आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम सहकलम ४९ भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री विनोद भुरले, श्री सर्वेश बेलसरे, पोहवा सुभाष गोहोकर, चेतन गजल्लवार, इमरान खान, सतीश अवथरे, पोअं किशोर वाकाटे, सुमित बरडे, हिरालाल गुप्ता, प्रफुल्ल गारघाटे आणि शशांक बादामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.


दिनचर्या न्युज