श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाज,चंद्रपूर द्वारे भव्य रक्तदान व निःशुल्क रोग तपासणी शिबिर
श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाज,चंद्रपूर द्वारे भव्य रक्तदान व निःशुल्क रोग तपासणी शिबिर

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
संत नगाजी महाराज वस्तीगृह, समाधी वार्ड येथे दिनांक 10 व,11,2022 ऑक्टोबरला संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवशी चालणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने
दिनांक १०/१०/२०२२ ला नाभिक समाज,चंद्रपूर द्वारे भव्य रक्तदान व निःशुल्क रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. समाज बांधवांनी जास्तीत जास्त या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाज आयोजकांकडून करण्यात येत आहे.
एखाद्या पेशंटला रक्ताची गरज भासल्यास फक्त मानवीय रक्त हाच एकमेव पर्याय आहे, रक्त कोणत्याच प्रयोगशाळेत निर्माण करता येत नाही.अनेक प्रकार चे गंभीर आजार आणि रक्त विकार असलेल्या रुग्णासाठी रक्ताची गरज असल्यास फक्त १ टक्केच दाते रक्तदान करत असतात.
शासकीय रक्तपेढी मध्ये ग्रामीण आणि शहरी रुग्ण, नातेवाईक आणि गरिबांना रक्तसाठीची भटकंती अस्वस्थ करणारी आहे. * चंद्रपूर * मध्ये कित्येक रुग्णांना रक्ता अभावी जीव गमवायची वेळ येते, हे आपले दुर्दैवच आहे.* पण आजच्या तरुण सुदृढ पिढीने रक्तदानासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे, तरच आपण या रक्त संकटावर मात करू शकतो.
हीच सामाजिक बांधिलकी जोपासून *चंद्रपूर नाभिक समाज मंडळींनी* यावर्षी *भव्य रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर* आयोजित केले आहे. सर्व चंद्रपूरकरानी यामध्ये सहभाग घ्यावा, *रक्तदान करावे तसेच धका-धकीच्या जीवनात आपले आरोग्य सुद्धा तपासून घ्यावे*
रक्तदान म्हणजे कुणावर उपकार, मदत किवा भेटवस्तू नसून प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.
स्थळ - श्री संत नगाजी वसतीगृह, चंद्रपूर.
दि.१०-१०-२०२२ सोमवार*
सकाळी ९.०० ते दु.१२.०० पर्यंत - रक्तदान
सकाळी ८.०० ते स.१०.०० पर्यंत - आरोग्य तपासणी
अधिक माहिती करिता संपर्क -
श्री सुशांत देवानंद नक्षिणे 9371961854