भारत जोडो यात्रेत नांदेड येथे खासदार बाळू धानोरकर यांनी घेतला सहभाग.

भारत जोडो यात्रेत नांदेड येथे खासदार बाळू धानोरकर यांनी घेतला सहभाग

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून, नांदेड जिल्ह्यामध्ये पदयात्रा सुरू आहे. गुरुवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेसहा वाजता कापसी गुफा येथून पदयात्रेला प्रारंभ झाल्यानंतर चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती.

सकाळी 5.45 वाजता कापशी गुंफा येथून पदयात्रा प्रारंभ झाली. चांदासिंघ कॉर्नर, नांदेड पोहचली. या मार्गात खासदार बाळू धानोरकर सहभागी झाले होते.