सैतान प्रत्येकाच्या शेजारी आले आहे, ते आपल्या दारावर येण्याची वाट बघण्या ऐवजी सैतानाचा मुकाबला करण्यासाठी पुढाकार घ्या व इतरांना ही सांगा : शोध पत्रकार निरंजन टकले niranjan takale




सैतान प्रत्येकाच्या शेजारी आले आहे, ते आपल्या दारावर येण्याची वाट बघण्या ऐवजी सैतानाचा मुकाबला करण्यासाठी पुढाकार घ्या व इतरांना ही सांगा :
शोध पत्रकार निरंजन टकले niranjan takale

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :१५ /१२ /२०२२
देशामध्ये सध्या सत्तेत असलेल्या लोकशाही विरोधी लोकांच्या सरकार मुळे देशातील नागरिकांचे शिक्षण, रोजगार, बंधुभाव हिरावण्याचा नियोजित प्रयत्न सुरु आहे, सत्याला दाबण्यासाठी असत्य रेटून सांगितल्या जात आहे, नागरिकां मधील बंधुभाव नष्ट होण्यासाठी धर्म आणि जातीच्या भिंती उभ्या केल्या जात आहे, भर्म निरपेक्ष नागरिक घडविण्याची संविधानाने राज्याकर्त्यावर जबाबदारी सोपाविली असतांनाही राज्यकर्तयेचा धर्मांध नागरिक घडविण्याचा प्रयत्न करत आहेत, सामूहिक नरसंहारामध्ये सहभागी गुन्हेगाराला न्यायालये दोषमुक्त सोडत आहे, बलात्काऱ्याला संरक्षण आणि निर्दोशा ला जेल मध्ये पाठवून लोकांमध्ये दहशत पसरविण्याचा जाणीवपूर्वक प्रयाण होतो आहे. हे सर्व सत्तेत बसलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जाणीवपूर्वक करीत आहेत. जगाच्या इतिहासात असे सत्तेवर बसलेल्या सैतानाला त्या त्या देशातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सैतानाचा नायनाट केला आहे. तेव्हा 2014 पासून भारतात लोकशाही मार्गाने सत्तेत येऊन सैताना सारखी वागणूक करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सत्ताधारी सैतानाला हाकालण्यासाठी लोकांनीच स्वतः संघटित व्हावे व प्रत्येकाने शेजाऱ्याला जागृत करत अहिंसात्मक मार्गाने व विधायक मार्गाने लोकलढा उभारून सैतानाला सत्तेतून हाकलावे असे आवाहन जज लोयाचे मारेकरी कोण हे शोध पत्रकारितेचा उत्कृष्ट नमुना ठरलेले दि वीक के मुंबई ब्युरो चे माजी रिपोर्टर श्री निरंजन टकले यांनी दि 9 डिसें 2022 ला चंद्रपूर येथे श्रोत्यांनी खचखाच भरलेल्या मातोश्री सभागृहामध्ये महापुरुषांच्या विचाराने कार्यरत सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट द्वारे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात आवाहन केले.

सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे मुख्य संघटक बळीराज धोटे यांचे अध्यक्षतेखाली आणि हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत सपन्न कार्यक्रमात विचारपीठावर प्राचार्य सूर्यकांत खनके, ऍड. फरहाद बेग, अनिसचे दिलीप सोळंके, डॉ अभिलाषा गावतुरे, जनविकास सेनेचे पप्पू देशमुख, स्वतंत्र मजदूर युनियन चे इंजि अशोक मस्के, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन चे राजकुमार जवादे, जिजाऊ ब्रिगेडच्या लताताई होरे, महाराष्ट्र अनिस चे पी. एम. जाधव, ई मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार निरंजन टकले यांनी जज लोयाचा मृत्यू कुणी आणि कसा केला याची माहिती गोळा करतांना आलेला दिड वर्षातील थरारक अनुभव अतिशय मुद्धेसूद रीतीने पुराव्यासह श्रोत्यासमोर मांडला. जय लोयाना न्यायालयात उच्च पदावर बसलेले जज आरोपीला वाचविण्यासाठी कशाप्रकारे शंभर कोटी रुपयाची लाच देऊ करीत होते व त्यांना मुंबई मध्ये फ्लॅट घेऊन देण्याचे लालूच दाखवत होते. ही गोष्ट सोहराबुद्धिन मर्डर केस ची विशेष न्यायालयात सुनावणी करीत असतांना जज लोयांना वारंवार कोण देत होते? याची माहिती त्यांनी आपली बहीण डॉ बियाणी ला कुठे व केव्हा सांगितली होती य. तरी पण आपण न घाबरता या केस चा निर्णय देणार असल्याची माहिती निरंजन टकले यांनी गोळा केलेल्या पुराव्याचे आधारे दिली.
जज लोयाला मुंबई वरून नागपूर ला न्यायाधीशाच्या घरी असलेल्या लग्नासाठी आणणे, रवीभवण या व्हिआयपी गेष्ट हाऊस मध्ये मुक्कामाला राहणे, तेथे मुंबई हायकोर्टाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती व ज्यांनी सोहराबुद्धिन चा खून घडवून आणला ते व्ही व्ही आय पी मुक्कामाला असणे, त्याला नागपूरातील राजकारणी सहकार्याची मदत मिळणे, जज लोयाचा मृत्यू हार्ट अटॅक ने झाल्याचे पोष्ट मार्तंम रिपोर्ट सांगत असले तरी त्या रिपोर्ट मध्ये झालेली खोडतोड, फॉरेन्सिक रिपोर्ट, लोयाच्या डोक्याला झालेली शस्त्राची जखम, त्यांचे कपडे रक्ताने माखलेले असणे, जज लोयाचे पार्थिव मुंबई ला न पाठवता त्यांचे मूळ गाव असलेल्या लातूर जिल्ह्यातील गातेगांव ला पाठविणे, पुन्हा पोष्टमार्तंम ची मागणी कुटुंबियांनी तरी ती उधळून लावत लोयांचे शवाला रात्रीच दहन करणे. या सर्व गोष्टी संशयास्पद असून सोहराबुद्धिन खुणाच्या आरोपीला वाचविण्यासाठी जज लोयाचा खून केंद्रात सत्तेत असलेल्या प्रभावशाली व्यक्तीने केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे निरंजन टकले यांनी आपल्या भाषणात सांगितले.

कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागातून मोठया संख्येने श्रोते आल्याने मातोश्री सभागृह खचखाच भरले होते. सभागृहा बाहेर एलईडी स्क्रीन लावून मैदानावर श्रोत्यासाठी खुर्च्याची व्यवस्था आयोजकांनी केली होती.

अतिशय नियोजन पूर्वक संपन्न झालेल्या या व्याख्यान कार्यक्रमात सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट च्या वतीने मुख्य संघटक बळीराज धोटे यांचे हस्ते *लोकशाहीचा योद्धा* हा पुरस्कार आणि शॉल देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन राजकुमार चिकटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी भास्कर सपाट, दिलीप होरे, रवींद्र चिलबुले, गुलाब जिवतोडे, मुन्ना आवळे, भाऊरावजी मानकर, योगेश आपटे, नवनाथ देरकर, अनंता आत्राम यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच सर्व संघटकांनी सहकार्य केले.