26 जानेवारीला रोप्य महोत्सवासाठी उप- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर..!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-२१/१/२०२३
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा विसापूर सैनिक शाळेजवळ असलेल्या जवळपास पाच एकराच्या परिसरात पसरलेल्या ह्या मातोश्री वृध्दाश्रम च्या रोप्य महोत्सव सोडळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटक म्हणून येत आहेत. भारतीय समाज सेवा संचालित मातोश्री वृद्धाश्रमाचा पंचवीस वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने मातोश्री वृद्धाश्रमाच्या रोप्य महोत्सवासाठी दिनांक 26 जानेवारी 2023 ला सकाळी 11 वाजता संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उद्घाटक म्हणून तर राज्याचे
वन, मत्स्य , सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार सुरेश धानोरकर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार कीर्ती कुमार भांगडीया , आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर , माजी खासदार नरेश पुगलीया यांच्या उपस्थितीत होत असून या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष श्रीमती शोभाताई फडणवीस, सचिव अजय जायसवाल, यांनी आयोजित मातोश्री वृद्धाश्रम येथे पत्रकार परिषदेतून दिली.
या वृद्धाश्रमाची स्थापना पंचवीस वर्षांपूर्वी सन 1996 ला करण्यात आली. 1996 शासनाकडून तुटपुंजी निधी मिळाला. या वृद्धाश्रमाला जन समाजाच्या मदतीने हे वृद्धाश्रम प्रगतीपथावर असून या ठिकाणी आज साठ वर्षावरील वयांचे जवळपास 35 ते 40 वृद्ध महिला पुरुष वास्तव्यास आहेत. जवळपास 100 महिला पुरुष राहण्याची या वृध्दाश्रमात व्यवस्था आहे. इथे वृद्ध महिला पुरुषांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, योगासाठी हाल, दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी, लोणचे बनवणे, सांडगे बनवणे, शेतीचे काम,अशा विविध उपक्रमातून त्यांची करमणूक होत असल्याचे स्वाभिमानाने प्रत्येक जन काम करतात असतात.
कोरोना काळात वृध्दाश्रमात असलेल्याच्या नातेवाईकांना
दूर ठेवून त्यांना भेटण्यासही मनाई करण्यात आल्याने या ठिकाणी कुठल्याही वृद्धाला कोरोना झाला नसल्याचे सांगितले. वृध्दाश्रमात आलेला प्रत्येक वृद्ध कुटुंबाचा एक भाग आहे. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक दाता आश्रमाला मदत करतात. यात बल्लारशा पोलिसांची खूप मदत होत असून वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात. जवळपास असलेल्या टोल नाक्याचीही वेळप्रसंगी मदत होते. जंगल परिसरात असल्याने वाघ , बिबटे, रानटी डुक्कर, अस्वल या हिस्त्र पशू पासून संरक्षण व्हावं म्हणून या परिसरात मोठे वॉल कंपाउंड व्हावं अशी सदिच्छा शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केली.
या वृद्धाश्रमात प्रवेशासाठी त्या वृद्धांचे आधार कार्ड, एखाद्या नातेवाईकाचे सहमती पत्र, सेवानवृत्त असेल तर त्यांच्याकडून मानधन स्वरूपात वृध्दाश्रमासाठी आम्ही थोडीफार निधी आम्ही घेत असतो. अन्यथा सर्व खर्च मातोश्री वृद्धाश्रम करीत असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक बलराम डोडाणी, एम. आय. डी चे अध्यक्ष मधुसूदन रूग्ठा, कोठारी, अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिनचर्या न्युज