चंद्रपूररात 'या' परिसरात दुस-या दिवशीही भूकंप सदृश्य हादरे!



चंद्रपूररात 'या' परिसरात दुस-या दिवशीही भूकंप सदृश्य हादरे!

भूकंपसदृश्य वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले


दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-१६/१/२०२३

चंद्रपूर काल रात्री 9.30 वाजता बाबूपेठ , महाकाली काँलरी,लालपट परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या झटक्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आज 16 जानेवारीला सायंकाळी पाच वाजून नऊ मिनिटांनी चंद्रपूर काल रात्री 9.30 वाजता बाबूपेठ , महाकाली काँलरी,लालपट परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या झटक्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आज  16 जानेवारीला सायंकाळी पाच वाजून नऊ मिनिटांनी  सदृश्य भुकंपाचे झटके  चंद्रपूर शहरातील महाकाली  कॉलरी, लालपेठ, बाबू पेठ परिसरात काही सेकंद भूकंप सदृश्य हादरे जाणवली असून नागरिकात पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.

कालच्या घटनेची दखल घेत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी भूकंप सदृश्य घटनेची वस्तुस्थिती तपासून अहवाल मागवत,नेमकं काय घडलं? याबाबत चौकशीचे निर्देश दिले आहे.

चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसराला 15 जानेवारी रोजी जाणवलेल्या भूकंपसदृश्य वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले .

बाबूपेठ भागात 15 जानेवारी 2023 रोजी रात्री 9:30 वाजता भूकंपासारखे धक्के जाणवले होते. यासंदर्भात काही नागरिकांनी ना. मुनगंटीवार यांना अवगत केले. प्रसार माध्यमांमध्येही यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना कोणतीही भीती न बाळगण्याचे आवाहन करीत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशी करून वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

या घटनेत त्या परिसरात काही नुकसान झाले असल्यास  त्याची माहिती देखील कळवावी व योग्य ती उपाय योजना करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.

याबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी सम्पर्क साधला असता भूगर्भात काही घडलं असेल अशी शक्यता वर्तविली मात्र जोपर्यंत चौकशीचा अहवाल प्राप्त होणार नाही तोपर्यंत नेमकं काय घडलं हे सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. चंद्रपूरच्या भूगर्भात नेमकं काय घडलं? हे चौकशीनंतर नागरिकांच्या पुढे येणारच, पण सतत 2 दिवस घडलेल्या या घटनेमुळे नागरिक दहशतीमध्ये आलेले आहे.

दिनचर्या न्युज