अचानक महाकाली मंदिर परिसरात पोलिसांचा ताफा दाखल! महाकाली परिसर हादरले! आतंकवादी असल्याची चर्चा ? मात्र पोलिसांचा...!





अचानक महाकाली मंदिर परिसरात पोलिसांचा ताफा दाखल!
महाकाली परिसर हादरले! आतंकवादी असल्याची चर्चा ? मात्र पोलिसांचा...!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : ११/१/२०२३
चंद्रपुरात महाकाली मंदिर परिसरात 11, 12 च्या सुमारास अचानक पोलिसांचा ताफा दाखवलं होतं. परिसरात एकच तारांबळ उडाली. अचानक झाले तरी काय? पोलिसांची शोध मोहीम सुरू होताच. परिसरात आतंकी असल्याची चर्चा सुरू झाली.
तर काय? पोलीस विभागाकडून महाकाली मंदिरात परिसरात प्रात्यक्षिक (मॅक ड्रिल) करण्यात आले.
याचा व्हिडिओ आज सर्वत्र सोशल मीडियावर फिरायला लागल्याने चंद्रपुरात मोठी खळबळ उडाली, महाकाली मंदिर परिसरात पोलिसांकडून आतंकवादी पकडण्यात आले, ही अफवा असून प्रत्यक्षदर्शी पोलिसांनी (मॅग ड्रिल )केला.
मग काय अचानक शासन-प्रशासनाचे फोन खणानू लागले.. एकच चर्चा!
चंद्रपुरात बॉम्ब
प्रत्यदर्शिच्या माहिती नुसार आज सकाळी अचानक शस्त्रधारी पोलीस महाकाली मंदिर परिसरात पोहचले, श्वानपथक, पोलीस कर्मचाऱ्यांचा भला मोठा ताफा मंदिरात पोहचला. हातात शस्त्र घेत पोलीस झाडाझडती घेऊ लागले, मंदिरात बॉम्ब असल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पोहचली, सोबतच मंदिरात आतंकवादी असल्याचे त्यांना बंदी करण्यात आली . बॉम्ब डिफ्युज करण्यात आला, पोलीस आरोपींना घेऊन बाहेर आले.

या घटनेने मंदिर परिसर अक्षरशः हादरून निघाले. लोकांनी विडिओ काढत वायरल करायला सुरुवात केली. हळूहळू चर्चा संपूर्ण शहरात पसरली. मात्र त्यांनतर हा सर्व पोलिसांचा सराव (मॉक ड्रिल) होता, सदर बाब नागरिकांना कळल्यावर त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला.

चंद्रपूरातील या सराव कार्यक्रमात ATS, चंद्रपूर पोलीस व C60 व श्वानपथकयांचा संयुक्त सहभाग होता. दिवसभर महाकाली मंदिरात बॉम्ब भेटला अशी अफवा नागरिकांमध्ये सुरूच आहेच.