अँड. मोरेश्वर टेंभुर्डे खरा समाजसेवा करणारा संघर्षयात्री पडद्याआड! राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या संघर्षमय जीवनाला विनम्र अभिवादन!



अँड. मोरेश्वर टेंभुर्डे खरा समाजसेवा करणारा संघर्षयात्री पडद्याआड! राष्ट्रवादी काँग्रेस


त्यांच्या संघर्षमय जीवनाला विनम्र अभिवादन!


चंद्रपूर वरोरा

वरोरा भद्रावती मध्येच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात अगदी साधी राहणी असणारा, निर्वव्यसनी, परखड विचार ठेवणारा राजकीय नेता म्हणून ओळख असणारे व दोन टर्मला आमदार व विधानसभेचे उपसभापती यशस्वी कारकीर्द केलेले अँड मोरेश्वर टेमुर्डे यांचे आज पहाटे सकाळी ह्रुदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

रोकठोक विचारसरणी व सर्वसामान्य लोकांना आपलेसे वाटणारे अँड मोरेश्वर टेमुर्डे हे अनेक जातीसमूहाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहायचे त्यांनी शेतकरी संघटनेत मोठे योगदान देऊन आपल्या समर्थकांची मोठी संख्या निर्माण केली दरम्यान त्यांच्यावर जिएमआर वर्धा पॉवर कंपनीविरोधातील आंदोलनात कारागृहात सुद्धा जावे लागले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने वरोरा भद्रावती तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.


एडवोकेट मोरेश्वर टेंभुर्डे यांनी माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीराला अग्नि न देता. मरनोत्तर देहदान करण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या मुलांनी आज त्यांचा मृत्यू देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान केले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी यांचे अंतिम दर्शन घेतले. तर राज्यातील नेत्यांनी आपल्या शोक संदेशही पाठविला.

राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांनी स्व. मोरेश्वर टेंभुर्डे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केले.
    राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष मा.श्री.शरदचंद्र पवार यांनी फोन करून, जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मा.श्री.मोरेश्वर टेमुर्डे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला,काही जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला, दिल्लीचे लोकसभा अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे,ते संपल्यावर मी मा.मोरेश्वर टेमुर्डे यांच्या घरी सांत्वनपर भेट द्यायला येईल असंही त्यांनी   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्ह्याचे  ग्रामीण   जिल्हाध्यक्ष   राजेंद्र वैद्य  यांना फोन करून त्यांच्या कुटुंबीयांना सांगण्यासाठी निरोप दिला.

अॅड. मो. वि. टेमुर्डे हे एका अंतहीन संघर्षाचे नाव आहे. ते सामान्य कुटुंबात जन्मलेले असले तरी आपल्या स्वपंखाने आकाश तोलणारे व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रातील विचारसंघर्षाला आणि मूल्यविचाराला नवे आयाम देणाऱ्या व्यक्तिमत्वापैकी ते एक होत. सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे कार्य करणारे टेमुर्डे साहेब हयांचे व्यक्तिमत्व उत्तुंग हिमालयासारखे आहे.
४ ऑगस्ट १९४२ ला चंद्रपूर जिल्हयातील चिमुर येथे त्यांचा जन्म झाला. ते लहानपणापासूनच तीव्र बुद्धिमत्ता व चिकित्सक वृत्तीचे होते. समाजसुधारणांचा ध्यास त्यांना बालपणापासून होता गणिताची आवड असल्यामुळे बी. एस. सी. ची पदवी संपादन करून त्यांनी जवळजवळ चार वर्ष शिक्षकी पेशा स्विकारला. वरोरा येथील कर्मवीर शाळेचे ते पहिले मुख्याध्यापक होते. संचालकाच्या गुलामगिरीत नोकरी करणे त्यांच्या मनाला रुचले नाही. नौकरी करताकरताच त्यांनी १९६८ मधे कायदयाची पदवी ग्रहण करून पुढे वकीलीचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. व आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले व जनसामान्यांमध्ये नावलौकिक मिळविला.
१९७२ मधे ते बार असोसिएशन वरोराचे अध्यक्ष झाले. वरोरा येथे जिल्हा व सत्र न्यायालय आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
राजकीय क्षेत्र :-- पासुन कॉंग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते
१९४९मध्ये काँग्रेसचा त्याग- १९६८
१९७२-७७-निमसडा ग्रामपंचायत व वरोडा पंचायत समितीचे सदस्य१९७८-मध्ये जिल्हा जनता पक्षाचे अध्यक्ष
६ मार्च १९८५विधान सभेवर निवड (आमदार)
१ मार्च १९९० - दुसऱ्यांदा विधानसभेवर निवड १९ जुलै १९९१- महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष
19 जून २००५% राष्ट्रवादीत प्रवेश

सामाजिक क्षेत्र :-
१९६७ पासून१९६८ ते ७२- विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष
वरोरा पंचायत समिती व नगरपालीकेतील प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष१९७१ ते ७४
खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष
कापुस उत्पादक संघाच्या शेतकरी आंदोलनात सहभाग१९७२
- १९७२विदर्भ गटसचिव संघटनेची स्थापना
डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव
- १९७२ ते ७४
ग्राहक भांडारचे सदस्य,१९७४ ते ८४ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
- १९७८चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक
१९८० व १९८२ मध्ये ११ दिवस कारावास
- १९८१-जंगलतोड सत्याग्रहात सहभाग व अटक
- १९८४- चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटनेचे संपर्क कार्यकर्ते • सरसेनापती, रेलरोको आंदोलन, शेतकरी संघटना
१९८९ पासून साईनाथ नागरी सहकारी पतसंस्थाचे अध्यक्ष
- १९९०विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्हेंटचे अध्यक्ष
सायप्रस येथील पीठासिन अधिकारी यांच्या आंतरराष्ट्रीय- १९९३परीषदेत सहभाग
चेन्नई, भोपाल, दिल्ली, अहमदाबाद, भूवनेश्वर या शहरात पीठासीन
- १९९३अधिकाऱ्यांच्या आंतरराज्यीय शैक्षणिक परीषदेत सहभाग व मार्गदर्शन.
सदर विविध क्षेत्रातील सक्रीय सहभागातून ते खऱ्याखुऱ्या अर्थाने समाजसेवा करणारे संघर्षयात्री आहेत. याची प्रचीती येते. साधेपणा, सत्यता, शांततेचे ते आदर्श आहेत. त्यांनी सत्तेतून चल अचल संपत्ती ज्यानमार्गे कमविण्याचा प्रयत्न केला नाही खरे तर विपरीत परिस्थितीवर मात करून केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर यशाचे शिखर गाठणा-या ग्रामीण व होतकरू युवकासाठी ते एक आदर्श आहेत. अशा खऱ्या समाज सेवा करणाऱ्या संघर्षयात्री नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली!