चंद्रपूर -गडचिरोली संपादक-पत्रकार संघाच्या वतीने 'पत्रकार दिन साजरा




चंद्रपूर -गडचिरोली संपादक-पत्रकार संघाच्या वतीने 'पत्रकार दिन साजरा

आजही विश्वसनीयता ही प्रिंट मीडियावर आहे-ना. सुधीर मुनगंटीवार 

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर - गडचिरोली संपादक- पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पणया वृत्तपत्राचा मराठी पत्रकार दिन म्हणून दिनांक 6/1 /2023 ला श्याम प्रशाद मुखर्जी वाचनालय येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक, प्रमुख वक्ते म्हणून राज्याचे वन व मत्स्य, सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार,मा.रविंद्रसिंग परदेशी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश अलोणे संस्थापक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ, देवराव भोंगळे जिल्हाध्यक्ष भाजपा, अनंत भास्करवार सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, संजय वैरागडे, महाव्यवस्थापक वेकोली,सुनिल पाटील अध्यक्ष संघर्ष समिती चंद्रपूर,नामदेव डाहुले, यांची प्रामुख्याने उपस्थित होती. नामदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा आरसा असून, त्याचे प्रतिबिंब हे समाज माध्यमावरच नाही, तर समाज परिवर्तनाचे एक माध्यम आहे. त्याचा योग्य वापर करणे हे पत्रकारांचे काम आहे.
मी बॅचलर ऑफ जर्नलिझम केलं . जर्लालिझम मध्ये एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झाला. फक्त पण एक मात्र अशी ही पदवी होती .मी जर अकाउंटन्सी मध्ये नापास झालो होतो तेवढाच विषय द्यावा लागतो . पण या कोर्सेस मध्ये पूर्ण विषय घेऊन पुन्हा परीक्षा द्यावे लागत असे. अशी ही पत्रकारिता पदवी आहे.
मग आपण उत्सुकतेपोटी  एखाद्याची बातमी लावतो. त्याची शहानिशा केली पाहिजे.
जर एखादा पत्रकार चुकला तर समाज बिघडेल. हे लोकांना खरं वाटतं. वर्तमानपत्रात येणाऱ्या सर्व बातम्या सत्यस असते असे नाही तर त्याच्या दोन्ही बाजू या पत्रकारांनी तपासूनच घेतल्या पाहिजे.
  तपासून चाणक्य बाबतीमध्ये कधी कधी ही अडचण येते .कारण एवढी स्पर्धा स्पर्धेमध्ये एका मिनिटात बातमी पोहोचली पाहिजे कधी कधी राईचा पर्वत ,नव्हे राईच्या फोटोचाही पर्वत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून आजही विश्वसनीयता ही प्रिंट मीडियावर आहे .आमच्यावरही अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जबाबदारी  आहे.की जग बदलायचं असेल 'दुनिया को बदलने वाले को धुंड रहे दुनिया बदलने वाला' दर्पणकाराच्या या पत्रकार दिनाच्या  निमित्ताने एक उदाहरण देताना म्हणाले की,
माझ्या घराच्या बाजूला मंदिर आहे .   त्या मंदिरात   पहारेदार मंदिराच्या दरवाजात असायचा. दर्शनाला येणारे पायदान इथे काढून  आत जायचे. त्या पहारेक-याला  चपलाकडे लक्ष ठेवण्यासाठी सांगितले गेले.  तिथून चप्पल चोरीला गेली. गायब चप्पल पाहिल्यावर ते रागाने जाला हे काम सांगितलं होतं  तो म्हणाला लक्ष द्यायला सांगितलेलं होतं.....! 
 .. समाज परिवर्तनात समजण्याचा भाग आहे हे. समाजामध्ये आपल्या या देशाचा अभिमान वाटावा असा नागरिकांचा समूह निर्माण करणे आणि हा समूह निर्माण करत असताना जो जो अडचणी आणि त्याला आडवं तुम्ही आपल्या या पत्रकार सृष्टीमध्ये काम करावे.
 पत्रकारांच्या संदर्भातील माहिती शासन दरबारी पोचून  लवकरच पत्रकारांना संबंधित मागण्याच्या न्याय संदर्भात आपला प्रयत्न राहील असेही नामदार मुनगंटीवार यांनी पत्रकार  दिनानिमित्त निमित्त कार्यक्रमात बोलताना सांगितले.

 जिल्हा पोलीस अधिक्षक मा.रविंद्रसिंग परदेशी,
 दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांनी आपलं दर्पण सुरू केलं सहा जानेवारीला एकूण आता तू आपला क्रांतिकारी   दिनाला जरी ते वृत्तपत्र आठ वर्ष झाले. पण तिथून मुहूर्त रोवली गेली आपल्या मराठी वर्तमानपत्राची बाळशास्त्री जांभेकर हे फक्त असे हे अष्टपैलू व्यसंगी व्यक्तिमत्व स्मरणासाठी आपण हा पत्रकार दिन साजरा करत असतो .बहुमोल योगदान आहे. आपल्या यांच्या लोकशाहीत लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण आहात आपण सर्व तळागाळात जाऊन  बातम्यांचे स्त्रोत जमा करतात. अपेक्षित अशी आपल्या बातमीची दखलही घेत असतो.  . त्या ग्राउंड लेव्हलच्या बातम्या करतात. आणि त्या दृष्टीने निश्चितच कुठेतरी मनात जुळणी सोडून जाते .याच्यासाठी काय करावे लागेल इमिजिएट कुठला  विचार करायला लावणारे  बातमीचे माध्यम असते.
  या कार्यक्रमाचे आयोजन संजय कन्नावार संपादक सा. चंद्रपूर क्रांती, कुमार जुनमलवार संपादक सा. कुमार दर्पण, डि. एस. ख्वाजा जिला प्रतिनिधी विदर्भ प्रिन्ट,रकीब शेख संपादक सा. कोलसिटी खबर यांनी आभार प्रदर्शन केले आहे.कार्यक्रमाला  बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते.