गोंडपिपरी येथील मुलीच्या वस्तीगृहात धुळघुस करणाऱ्या अखिलला अखेर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल !





गोंडपिपरी येथील मुलीच्या वस्तीगृहात धुळघुस करणाऱ्या अखिलला अखेर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल !

दिनचर्या न्यूज पोर्टलची दखल!

शैक्षणिक क्षेत्रात खळबळ करणारी घटना,

गोंडपिपरी येथील मुलींच्या वस्तीगृहात दारुड्याचा अश्लील चाळे प्रकार, कारवाई मात्र अदाखलपात्र!
या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती बातमी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
गोंडपिपरी कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात अखिल ताडशेट्टीवार हा 19 तारखेला येथील वस्तीगृहात दारूच्या नसेत रात्रीच्या वेळेस अंदाजे आठ वाजताच्या सुमारास मुलींच्या वस्तीगृहात शिरूर घाणेरडा, अश्लील शब्दात मुलींना धमकावुन बळजबरी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे येथील वस्तीगृहातील मुली अक्षरशः घाबरून आहेत . शैक्षणिक क्षेत्राच्या वर्तुळात अत्यंत निर्दयी व घृणास्पद घटना आहे.
तेथील अधिकशिका लता थिपे (खामनकर) यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारी नुसार गैर अर्जदार अखिल ताकसेट्टीवार याच्यावर अदाखलपात्र गुन्हा दाखल करून त्याला जमानीतीवर सोडण्यात आले होते. याची माहिती चंद्रपूर पत्रकारांना सांगितले असता पत्रकारांनी गोंडपिपरी येथील वस्तीगृहात जाऊन शहानिशा केली असता प्रकरण वेगळेच आणि दखलपात्र असल्याचे निदर्शनास आले. याचा पाठपुरावा करून विविध माध्यमातून बातम्या प्रकाशित करून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांना यासंदर्भात ची माहिती होतास त्यांनी तत्काळ सूत्रे हलवून मुलचे एचडीपीओ यांना चौकशीचे आदेश देऊन या प्रकरणात संबंधित आरोपीवर भारतीय दंड संहिता 1860 नुसार 354, 354A,448, बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम नुसार 12, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती नुसार 3(1)w(1),3(1)w,3(1)(vo) अशा विविध कलमाखाली गोंडपिपरी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 
 पुढील तपास ए डी पी ओ त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे.