बल्लारपूर वन परिसर क्षेत्रात बिबट्याचा मृत्यू !
दिनचर्या न्युज :-
बल्हारपुर - बल्लारपूर वनपरिक्षेत्रात येत असलेल्या प्रादेशिक वन विभागाच्या हद्दीत चंद्रपुर मार्गावरील महापोरपण (पावर हाऊस) ने परिसरात दिनांक 27.02.2023 ला दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास बिबट वन्यप्राणी मृता अवस्थेत आढल्याबाबत महापारेषण विभागाचे कर्मचारी यांचे कडुन वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना माहिती प्राप्त झाली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह हे अधिनस्त कर्मचारी यांचे सह घटना स्थळी तात्काळ हजर होवुन मृत बिबट या वन्यप्राण्याचा शवाचा मौका पंचनामा करुन शवास ताब्यात घेतले व प्राथमीक वनगुन्हा क्रमांक 08944/223587 दिनांक 27.02.2023 जारी करण्यात आला. त्यानंतर मृत बिबट वन्यप्राण्याचा शवविच्छेदन करण्याकरीता शव वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्य प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले.
सदर प्रकरणाचा पुढील तपास श्रीमती श्वेता बोड्डु, उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर व श्री. श्रीकांत पवार, सहाय्यक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनात श्री. नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह हे करीत आहे.