भिवकुंड येथे डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरात अखंड शिवमहापुराण कथा सप्ताह
भिवकुंड येथे डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरात अखंड शिवमहापुराण कथा सप्ताह

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामधील भिवकुंड येथे 'ॐ डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदीरात' अखंड शिवमहापुराण कथा सप्ताहाचे आयोजन सोमवार दि. १३ मार्च २०२३ ते रविवार दि. १९ मार्च २०२३ पर्यंत करण्यात आले आहे. मागील सतरा वर्षापासून दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात शिवमहापुराण भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.
दिनांक 13 / 3/2023 ला साडेसहा वाजता घटस्थापना,
प्रार्थना व हरिपाठ,दिप उत्सव व दिंडी सोहळा, भजन मंडळ, संत दर्शन,  इत्यादी दैनंदिन कार्यक्रम  संपन्न होणार आहेत.
गोपाळकाला व महाप्रसाद कार्यक्रम ● रविवार दि. १९/३/२०२३ ला कथाव्यास प.पु. गुरुवर्य ईश्वर महाराज यांचे   काल्याचे किर्तन  होणार आहे.
 दुपारी १ ते आपल्या आगमनापर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात आमडी (बे.), खेक, कोरा, पेरखेडा, दसोडा, धामनगांव, सिल्ली, रंगाबोडी, खानगांव, माकोना, वाहनगांव, खापरी बोधली, खडसंगी, सावरी व परिसरातील समस्त जनता जनार्धन मंडळी 
 परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
ॐ डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदीर समिती, भिवकुंड यांच्याकडून करण्यात येत आहे.
   शिवमहापुराण भागवत कथा सप्ताहात येताना नागरिकांना नशापाणी करुन येण्यास सक्त मनाई आहे.