भिवापूर हनुमान मंदिरात योग व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहर महानगर पालिका, चंद्रपूर जिला पतंजली योग समिती,महिला पतंजली योग समिती च्या संयुक्त विद्यमाने...शहर रोगमुक्त करण्यासाठी महापालिका आयुक्त विपीन पालिवाल जी यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील विविध झोन मध्ये योग व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन योग मार्गदर्शक व प्रदेश कमेटी सदस्या स्मिताताई रेभनकर, जिला प्रभारी नसरीन शेख, जिला महामंत्री सौ.अपर्णा चिडे,सौ.लता चाफले व सौ.मनिषा गौरकार यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे..या उपक्रमांतर्गत स्थानिक भिवापूर वार्ड हनुमान मंदिरात आज सकाळी 6ते 8 वाजता दरम्यान...योग शिबीर व साधक साधिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली....योग शिक्षक मोहनराव मसराम सर, योगशिक्षिका सौ. ज्योतीताई मसराम, भिवापूर झोन रुग्णालय केंद्र प्रमुख डॉ.खेरा मॅडम, दीपक कटकोजवार यांच्या पुढाकाराने शिबीराच्या तिस-या सत्राला सुरूवात करण्यात आली....तर साधकांची आरोग्य तपासणी.. डॉ.वनिता गर्गेलवार, डॉ.आश्विनी भारत, आशा वर्कर रंजीता सातपुते, मनिषा गुरुदेव यांच्या टिम ने सहकार्य केले.. यावेळी योग साधक व साधिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती....