शहरात मुख्य रस्त्यावर उभी असलेल्या गाडीला लागली आग

शहरात मुख्य रस्त्यावर उभी असलेल्या गाडीला लागली आग


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:- 30/3/2023
शहरात उन्हाचा तडाका वाढत असून, दुपारी साडेबाराच्या दरम्यान मुख्य मार्गावर उभी असलेल्या इको गाडीला अचानक आग लागल्याने तारांबळ उडाली. आजूबाजूच्या दुकानदाराच्या समय सूचकतेने गाडीवर पाण्याचा बोचारा करून आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलाची गाडी येण्यापावत आग आटोक्यात आली होती. ईको गाडी असून एम एच 34ए.ए 1091 हा हा गाडी नंबर आहे. मुख्य रस्त्यावर आराधना ड्रेसेस च्या समोर अचानक गाडीला आग लागल्याने आजूबाजूच्या दुकानदारांची धावपळ सुरू झाली होती. लोकांची गर्दी ही पाहण्यासाठी जमली होती.
आग शार्कसर्किटने लागली असल्याची चर्चा सुरू होती.