.. या पंचायत समितीत जागतिक महिला दिनी विधवा कुप्रथा निर्मूलन शुभारंभ
समाजात अस्तित्वात असलेली विधवा प्रथा,परंपरा समूळ नष्ट करुन महिलांना पुर्ववत सामाजिक दर्जा प्राप्त करुन देण्यांसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवहान-अल्काताई आञाम
माजी सभापती,पंचायत समिती
दिनचर्या न्युज :-
गडचिरोली, प्रतिनिधी
पंचायत समिती,गडचिरोली द्वारा दिनांकः 08 मार्च,2023 ला जागतिक महिला दिवस मा.श्री राजेंद्र भुयार,अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी ,मा.अल्काताई आञाम,माजी सभापती,पंचायत समिती,मा.कुसूमताई आलाम,माजी जि.प.सदस्या,मा.हेमलता परसा,गट शिक्षण अधिकारी ,मा.अर्पना पातकमवार,सहा,प्रशासन अधिकारी यांचे यांचे उपस्थितीत आयोजित करण्यांत आलेला होता. होती.सदर कार्यक्रमात सामाजिक समता,बंधुता,एकता न्याय विविध महिलांचे अधिकार व कायदे यावर मार्गदर्शन कृरण्यांत आले.महिलांचे गितगायन,सांस्कृतिक कार्यक्राम,लिंबू-चम्मच,सांगित-खुर्ची उपक्रम आनंदात राबविण्यांत आले.त्यासह विधवा प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी शुभारंभ पंचायत समिती कार्यालया पासून करण्यांत आला.सदराहू कार्यक्रमात विविध क्षेञात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते सन्मानपूर्वक करण्यांत आला.
ग्राम विकास विभाग,मंञालय,मुंबई यांचे परिपञक दिनांकः 17 मे,2022 अन्वये समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होणेबाबत परिपञक निर्गमित करण्यांत आले आहे.आज आपण सर्व विज्ञानवादी व प्रगतिशील समाज म्हणून वाटचाल करीत असलो तरीही,पतीच्या निधनावेळी पत्निचे कुंकू पुसणे,गळ्यातील मंगळसूञ तोडणे,हातातील बांगड्या फोडणे,पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या प्रथांचे समाजात पालन केले जात आहे.पतीचे निधनानंतर विधवा म्हणून पत्नीला समाजाच्या अवहेलनेस समोरे जावे लागते.धार्मिक वा सामाजिक कार्यात त्यांचा सहभागी करुन न घेणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला योग्य नाही.
या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तीला प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते.सदर महिलांप्रमाणे सन्मानाने जागण्यांचा पूर्ण अधिकार आहे. असे धनंजय शं.साळवे
प्रशासक तथा
गट विकास अधिकारी
पंचायत समिती,गडचिरोली यांनी सांगितले.
.त्यामुळे अशा प्रथांचे निर्मूलन होणे आवश्यक आहे.