राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे एप्रिल फुल आंदोलन
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे एप्रिल फुल आंदोलन.

चंद्रपूर:-1/4/2023

१ एप्रिल निमित्त मोदींच्या फसव्या आश्वासनांसह खोट्या विकासाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असा केक तरुणांच्या उपस्थितीत कापून राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले.

मोदी साहेबांनी सांगितलेल्या विकासाच काय झालं ? देशातील तरुणांच्या रोजगाराच काय झालं..? वर्षाकाठी दोन कोटी नोकऱ्यां देण्यात येईल या आश्वासनाच काय झालं..? पेट्रोल, डिझेल, गॅस च्या किमती कमी करणार या घोषणेचं काय झाल..? प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार या दिलेल्या आश्वासनाच काय झाल..? १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत सर्वांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सर्वांना स्वतःचे घर मिळणार या आश्वासनाचे काय झाले..? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात येईल या घोषणेच काय झाल..? अश्या घोषणासहं एप्रिल फुल च्या घोषणा देत, एप्रिल फुल म्हणजेच मोदी विकासाचा वाढदिवस म्हणून आज केक कापून केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव आन्दोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, रायुकॉ शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे, भोलू भैय्या काचेला, माजी सरपंच अमोल ठाकरे, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, अल्पसंख्याक अध्यक्ष नौशाद सिद्धिकी, संभा खेवले, बब्बू भाई ईसा, कुमार पॉल, ग्रा.प. सदस्य अनुकूल खन्नाडे, केतन जोरगेवार, रोशन फुलझेले, गणेश बावणे, सूरज चव्हाण, राहुल वाघ, आकाश बंडीवार, सौरभ घोरपडे, तुषार वेट्टी, राजकुमार खोब्रागडे, पंकज मेंढे, अरविंद लोधी, विपिल लाभाने, मुन्ना टेंभूरकर, नंदू जोगी, राहुल भगत उपस्थित होते.