शहराच्या मध्यभागात बिट्टू कंजर बनवत होता बनावट दारू स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई



शहराच्या मध्यभागात बिट्टू कंजर बनवत होता बनावट दारू स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर : शहराच्या मध्य भागात बिट्टू कंजर बनावट दारू बनवत असल्याची गुप्त माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली . त्या माहितीच्या आधारे.
स्थानिक गुन्हे शाखेला कंजर मोहल्ला, जलनगर वार्ड चंद्रपूर येथील रविंद्र उर्फ बिट्टु कंजर हा त्याचे राहते घरी मध्य प्रदेश येथून अवैध्यरित्या विदेशी दारू आणून ती दारू बॉटल मधून काढून त्यामध्ये जास्त नशा आणणारे मानवी स्वास अपायकारक असलेले द्रव्य मेसळ करून ती भेसळ केलेली बनावट दारू भंगारातून जमा केलेल्या ROYAL STAG DELUXE WHISKY या कंपनीच्या विदेशी दारूच्या बॉटलमध्ये भरून कंपनीचे नक्कली झाकण व बुच लावून ती बनावट दारू ROYAL STAG DELUXE WHISKY आहे असे लोकांना भासवून बनावट दारूची अवैध विक्री करीत होता

वरील प्रमाणे मिळालेल्या माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी नामे रविंद्र उर्फ बिट्टु कंजर याचे घरी छापा टाकला असता आरोपी हा त्याचे राहते घरी बनावट दारू तयार करीत असताना पोलीसांना पाहुन घराचे मागचे दाराने पळुन गेला. त्यानंतर पोलीसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्याचे घरात ) ROYAL STAG DELUKE WHISKY या कंपनीच्या जुन्या बॉटलचे तोडलेले बुच 2 ) ROYAL STAG DELUXE WHISKY या कंपनीच्या जुन्या बॉटल मध्ये बनावट दारू भरल्यानंतर बॉटलला लावण्या करीता वापरात येणारे नविन बनावट बुच व झाकण 3) बनावट दारू बॉलींग करीता वापरण्यात येणाऱ्या ROYAL STAG DELLIXE WHISKY या कंपनीच्या जुन्या 180 मिली क्षमतेच्या रिकाम्या कार्यच्या बॉटल 4) OFFICER CHOICE WHISKY या कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या रिकाम्या केलेल्या प्लॅस्टीक बॉटल 5) मध्य प्रदेश शासनाचे कागदी लेबल असलेल्या OFFICER CHOICE WHISKY या कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या विदेशी दारूने भरलेल्या एकूण 295 नग प्लॉस्टीक बॉटल 6) ROYAL STAG DELLIXE WHISKY या कंपनीच्या जुन्या 180 मिली क्षमतेच्या बॉटलमध्ये बनावट भेसळ दारू भरून त्याला नविन झाकण व बुध लावून असलेल्या एकूण 36 नग बॉटल 7) जुन्या बॉटलचे बूच तोडण्या करीता वापरण्यात येणारे एक कटर 8) बनावट दारू बॉटलमध्ये भरण्या करीता वापरण्यात येणारी एक प्लॉस्टीक ची चाळी, 9) दोन लिटरच्या प्लॉस्टीकच्या कॅन मध्ये एकूण 10 लिटर मेसळ करण्याकरीता वापरण्यात येणारा उग्रवास येत असलेले पाण्यासारखे दिसणारे द्रव्य 10 ) एका 5 लिटरच्या कॅन मध्ये मेसळ केलेले लालसर उग्रवास येत असलेले द्रव्य असा एकुण 31925/- रू. चा बनावट दारू बनविण्याकरीता वापरण्यात येणारा मुद्देमाल मिळून आला.

आरोपी नामे रविंद्र उर्फ बिटटू रणधीर कजर, वय 25 वर्षे रा. कजर मोहल्ला, जलनगर वार्ड चंद्रपूर याने मध्यप्रदेश राज्यातून OFFICER CHOICE WHISKY या कंपनीची विदेशी दारू आणून त्या विदेशी दारू मध्ये मानयि स्वास्थास अपायकारक असणारा कोणतातरी उम्र नाकाला झोंबणारा वास असलेले द्रव्य पदार्थ भेसळ करून ती बनावट दारू तयार करून लोकांना ती खरी असल्याचे भासवुन स्वतःचे आर्थीक फायदया करीता लोकांची फसवणूक करण्याचे उद्देशाने ती दारू विक्री करण्याकरीता रिकाम्या ROYAL STAG DELLIXE WHISKY या कंपनीच्या जुन्या 180 मिली क्षमतेच्या बॉटलमध्ये भरून त्याला बनावट नविन झाकण व बुध लावून बनावट दारू तयार करीत असताना मिळून आल्याने त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर अपराध क. 415 / 2023 कलम 420, 328 भादवि सह कलम 65 (ज) 65 (4) 65 (ड), 05 (ई), 65 (फ), 67, 67(1)(अ) 67 (क). 108 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 63 प्रतीलीपी अधिकार अधिनियम 1957 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, पोलीस अमलदार संजय आतकूलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे रविंद्र पंधरे कुंदनसिंग बावरी, गोपाल आतंकुलवार, नरेश बाहुले प्रांजल झिलपे, चंद्रशेखर आसुटकर यानी केली.