आ. सुभाष धोटे यांची काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वर्णी

आ. सुभाष धोटे यांची काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वर्णी Chandrapur District Congress

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षपदी लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे subhash dhote यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसला सर्वांना घेऊन चाललेला एक आमदार ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मिळाल्याचा ग्रामीण भागात उत्साह संचारला आहे. मागील काही दिवसापासून चंद्रपूर शहरात जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी वाद सुरू झाला होता.
अखेर पक्षश्रेष्ठींनी आमदार सुभाष धोटे यांची वर्णी लागली.
चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांवरून भाजपची हात मिळवनी जल्लोष केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी त्यांच्या पदाचा कार्यभार हा शहराध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे देण्यात आला होता. यातच रामू तिवारी यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांवर नार्को चाचणीची मागणी केली होती.

तेव्हा बँकेच्या संचालकांनी रामू तिवारी यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.

त्यानंतर राजकीय घडामोडी आणखी वाढल्या. यातच आमदार विजय वडेट्टीवार हे दिल्लीला जाऊन प्रदेशाध्यक्ष नाना पडोले यांची तक्रार केली. त्यानंतर पुन्हा एकदा वातावरण चिघळले आणि आता चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.